Home रत्नागिरी बोंड्ये गावच्या विकासासाठी कटीबद्ध- आमदार शेखर निकम; ग्रामस्थांनी मानले आमदार शेखर निकम...

बोंड्ये गावच्या विकासासाठी कटीबद्ध- आमदार शेखर निकम; ग्रामस्थांनी मानले आमदार शेखर निकम यांचे आभार

121
0

आशाताई बच्छाव

IMG-20230526-WA0052.jpg

बोंड्ये गावच्या विकासासाठी कटीबद्ध- आमदार शेखर निकम; ग्रामस्थांनी मानले आमदार शेखर निकम यांचे आभार

देवरूख– संगमेश्वर तालुक्यातील बोंड्ये गावात आमदार शेखर निकम यांनी आपल्या विकास फंडातून उपलब्ध करून दिलेल्या निधीतून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचे उद्‍घाटन आमदार शेखर निकम यांच्याहस्ते काल गुरूवारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.

बोंड्ये गावातील अनेक वर्षे प्रलंबीत विकासकामांची व रस्त्यांची समस्या आमदार शेखर निकम यांनी सोडवल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. यापुढेही बोंड्ये गावातील विकासासाठी आपण प्रयत्नशिल राहून अधिकाधिक विकासात्मक कामे करण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असे आश्वासन आमदार निकम यांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष मंगेश बांडागळे, राष्ट्रवादीचे युवक तालुका उपाध्यक्ष नितिन भोसले, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष हुसेन बोबडे, संजय कदम, अनंत जाधव, माजी सरपंच ललीता गुडेकर, श्रीम. गुरव, संतोष चव्हाण, साईनाथ पांचाळ, विष्णू गुडेकर, भिवाबा गुरव, संदिप गुरव व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleयेवते पाटील विवाह सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती
Next articleअमरावती लोकसभेची जागा काँग्रेसनेच लढवावी; प्रदेश काँग्रेस सरचिटणीस किशोर बोरकर यांची मागणी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here