Home गुन्हेगारी देवळा तालुक्यात मोबाईल चाँर्जिगच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार

देवळा तालुक्यात मोबाईल चाँर्जिगच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार

169
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230510-221424_Google.jpg

देवळा,(भिला आहेर प्रतिनिधी)- : मोबाईल चार्जिंग करण्याच्या बहाण्याने गुंजाळनगर येथील बावीस वर्षीय तरुणाने मंगळवार (दि.९) रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास परिसरातील एका साठ ते पासष्ट वर्षीय महिलेला इजा करत बलात्कार केला.या घटनेबाबत देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली . आरोपीला आज बुधवार (दि.१०) रोजी कळवण न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे .
याबाबत देवळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुंजाळनगर ता.देवळा येथील ज्येष्ठ महिला घरात एकटी असताना संशयित आरोपी सागर बुवाजी तलवारे (वय २२) रा.गुंजाळनगर हा मोबाईल चार्जिंग करण्याच्या बहाण्याने घरात घुसला आणि घराचे दार बंद करून घेतले. सदर महिलेचा गळा दाबत डोके भिंतीवर आदळून फिर्यादीच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर व डोक्याला दुखापत करत जबरदस्ती केली. या झालेल्या प्रकाराबद्दल कोणाला काही सांगितले तर मारून टाकण्याची धमकी देत सदर महिलेचा पाचशे रु.किमतीचा मोबाईल घरातून घेत पळून गेला. पोलीस निरीक्षक समीर बारवकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले . व सदर आरोपीस ताब्यात घेऊन अटक केली. त्यास बुधवारी कळवण न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे, ज्योती गोसावी आदी करीत आहेत. एका निष्णात महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून
,आरोपीला कडक शासन व्हावे ,अशी मागणी करण्यात आली आहे .

Previous articleठेंगोड्या गावात विट्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्याचे भूमि पूजन
Next articleबडनेरा लागत असलेल्या जंगलात अमरावतीच्या इंजिनिअरिंगच्या तरुणीचा गळा चिरून खून! तरुणी गंभीर जखमी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here