आशाताई बच्छाव
सन्मानरुपी लाभलेला पुरस्कार पत्रकारांना समर्पित…!”युवा मराठा”माझा नाही;आपला सगळ्यांचाच!!
पुणे,(प्रशांत नागणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-पुणे शहरातील वल्लभनगर भागात असलेल्या आचार्य अत्रे रंगमंदीरात बुधवार दि.(२२) रोजी युवा मराठाचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांना देण्यात आलेला “संविधान रक्षक २०२३ हा पुरस्कार आपण आपल्या प्रतिनिधी पत्रकार बांधवाना समर्पित करीत असल्याचे सांगितले,विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला,यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.आपणास मिळालेला हा पुरस्कार श्रीमती आशाताई बच्छाव यांच्या उतमरित्या सुरु असलेल्या कौशल्य गुणांमुळे आणि खंबीर मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या कर्तृत्वामुळे युवा मराठाची दिवसेदिवस कौतुकास्पद वाटचाल सुरु असल्याने ,महाराष्ट्रात मुंबई ,पुणे,ठाणे,पालघर,रत्नागिरी ,सोलापूर,कोल्हापूर ,सांगली,जालना,परभणी,नांदेड,बीड,उस्मानाबाद,वाशिम,बुलढाणा,अकोला,गडचिरोली,धुळे,नंदुरबार,नाशिक,गुलबर्गा,बिदर,जळगांव आदी तेवीस जिल्ह्यात युवा मराठा न्युजच्या एकूण किमान १०० ग्रामीण व शहरी पत्रकार प्रतिनिधीच्या अमूल्य अशा योगदानामुळेच हा पुरस्कार आपल्याला मिळाल्याचे राजेंद्र पाटील राऊत यांनी सांगितले.तर आजच्या मिळालेल्या पुरस्काराचे ख-या अर्थाने हक्कदार युवा मराठा परिवाराचे सगळेच कौटुंबिक सदस्य म्हणून पत्रकार असलेले व संपादकीय मंडळातील पदाधिकारी हेच असून,त्यांच्या सेवेत हा पुरस्कार आपण समर्पित करीत असल्याचे शेवटी राजेंद्र पाटील राऊत यांनी सांगितले.युवा मराठा हा माझा नसून,आपला सगळ्यांचा तुमचा माझा, आणि अठरा पगड जातीधर्माचे व बारा बलुतेदारांच्या हक्क व न्यायासाठी लढणारा झगडणारा असल्याने या युवा मराठाच्या प्रवासात जास्तीतजास्त बहुजनांना सहभागी करुन घेण्याचे आवाहनही याप्रसंगी राजेंद्र पाटील राऊत यांनी केले.या कार्यक्रमास असंख्य शासकीय अधिकाऱ्यांसमवेतच युवा मराठाचे पुणे जिल्हा ब्युरो चीफ विलास पवार, मराठवाडा विभागीय संपादक बालाजी पाटील,पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील,वृतसंपादक आंशूराज पाटील राऊत,चांदवड तालुका प्रतिनिधी सुनील गांगुर्ड आदी बहुसंख्येने हजर होते.