राजेंद्र पाटील राऊत
काय आहे व-हाणे प्रकरण..पत्रकार भवन जागेचा मुद्दा का गाजतोय सर्वत्र! मालेगांव,(विजय चांदणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-नाशिकच्या मालेगांव तालुक्यातील व-हाणे ग्रामपंचायत सर्वत्र चर्चचा विषय का ठरली?असे काय घडले या ग्रामपंचायतीत की,वादग्रस्त ग्रामपंचायत म्हणून संपूर्ण नाव गाजतंय.तर त्यासाठी व-हाणे गावातील गावठाण जागेवर पत्रकार भवनचा मुद्दा मोठा महत्त्वपूर्ण ठरतो.व-हाणे गावात पत्रकार भवनसाठी गावठाणात जागा मिळावी म्हणून युवा मराठाच्या व्यवस्थापकीय संपादक श्रीमती आशाताई तथा अलका बच्छाव यांनी व-हाणे ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा सांळुखे यांचेकडे शासनाचा अध्यादेश (जी.आर)दाखवत जागेची मागणी केली.त्यावर ग्रामसेविका सांळुखे यांनी शासनाच्या जी.आर.ला केराची टोपली दाखवत मागणी धुडकावून लावली.त्यानंतर काही दिवसातच म्हणजे फेब्रुवारी २०२० मध्ये श्रीमती सांळुखे यांनी अलका बच्छाव यांनी मागणी केलेल्या जागेवरच युवा मराठा परिवाराच्या सार्वजनिक पाणपोईचे स्वतःच्या उपस्थितीत उदघाटन केले.व त्या जागेसाठी श्रीमती बच्छाव यांचेकडून रोख पन्नास हजार रुपये घेतलेत.आणि सदरची जागा हि गावठाण असल्याने त्याचा निर्णय आगामी ग्रामसभेवर घेतला जाईल असा मासिक सभेचा ठराव श्रीमती सांळुखे यांनी अलका बच्छाव यांच्या अर्जानुसार पारित करुन ठेवला.पण…त्यानंतर ग्रामसेविका सांळुखे यांच्यावर दबाव वाढल्याने त्यांनी केलेल्या ठरावाला बांधील राहून ग्रामसभेत निर्णय न घेता वेळकाढू धोरण सुरुच ठेवले.त्यामुळे युवा मराठा परिवाराने सांळुखे यांच्या चौकशीची मागणी लावून धरली.तर त्यात सन २०२० मध्ये ग्रामसेविका दोषी आढळल्या,मात्र निर्ढावलेल्या प्रशासनातल्या गेंडयाची कातडी पांघरलेल्या अधिकाऱ्यांनी सदरचा दोषारोप चौकशी अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर न करता दडवून ठेवला.म्हणून युवा मराठा परिवाराने माहे सप्टेंबर २०२२ मध्ये आमरण उपोषण आंदोलन केले.त्यावेळी कुठे तब्बल दोन वर्षानी सदरचा दोषारोप अहवाल वरिष्ठ कार्यावायास सादर करण्यात आला,आणि ग्रामसेविका सांळुखे यांची व-हाणे येथून तडकाफडकी बदली करण्यात आली.आणि त्या जागेवर हेमंत शिरसाठ या ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात आली.मात्र मुळ मुद्दा हा होता की,२० जुलै २०२० ला ग्रामसभेचा केलेला ठराव त्याचा कुठलाही विचार न करता शासनाच्या डोळ्यात धुळफेक करुन दिशाभूल करण्याच्या सुरु असलेल्या कामकाजाचा कुठे तरी पर्दाफाश व्हावा म्हणून ऐन दिवाळीत माहे आँक्टोबर २०२२ महिन्यात युवा मराठाचे प्रमुख राजेंद्र पाटील राऊत यांनी पंचायत समितीच्या मालेगांव येथील कार्यालयासमोर जाहिर आत्मदहनाचा प्रयत्न केला.म्हणून मग कुठे घाईगडबडीत व-हाणे ग्रामपंचायतीने १५ नोव्हेंबर २०२२ रोजी गावात एक ग्रामसभा घेतली.अर्थातच हि ग्रामसभा देखील बोगसच होती.कोरमसंख्या पुर्ण नसतानाही ग्रामसेवकाने बळजबरीने ग्रामसभा झाल्याचे दाखवून ,या ग्रामसभेत गावात गावठाण जागा शिल्लक नसल्याचे नमूद करुन ठराव पारित केला खरा…पण मग २०जुलै २०२२ रोजी मासिक मिटींगवर ठराव पारित करुन पत्रकार भवनची जागा कुठे गेली?तिची काय विल्हेवाट लावली?सध्या ती जागा कुणाच्या ताब्यात आहे याचा कुठलाही समाधानकारक खुलासा मात्र ग्रामपंचायत प्रशासन करु शकलेले नाही.एकंदरीत काय तर कागदोपत्री खोटे नाटे फेरफार सादर करुन बनवाबनवीचे दस्त तयार करण्यात ग्रामपंचायत प्रशासन आघाडीवर आहे.१५ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या ग्रामसभेला युवा मराठा परिवाराचे प्रमुख राजेंद्र पाटील राऊत यांनी उपस्थित रहावे म्हणून त्यांना अधिकृत पत्र देण्यात आलेले होते,आणि त्यानुसार पाटील यांनी पोलिस संरक्षण देखील घेतलेले होते,मात्र प्रशासनातीलच एका हितचिंतकाने केलेल्या विनंतीचा मरातब राखून त्या दिवसांच्या ग्रामसभेला मुद्दम पाटील यांनी जाणे टाळले.कारण हितचिंतकाने सांगितले होते की,तुम्ही व-हाणेत आल्यावर वातावरण बिघडण्याची शक्यता आहे.आणि काही लुंग्या सुंग्या सडकछाप पुढा-यांनी तुमच्यावर हल्ला करण्याची तयारी केलेली असल्याची माहिती दिल्याने सदर ग्रामसभेला पाटील यांनी जाणे मुद्दामच टाळले.मात्र मग त्या दिवशी घेतलेली बोगस व बनावट ग्रामसभा बरंच काही खर खोट दर्शवून जाते,त्याची सत्यता माहिती अधिकारातून उघड होणारच आहे.तुर्तास एव्हढेच! ( क्रमश) सविस्तर बातमी उद्या अवश्य वाचाच!