आशाताई बच्छाव
जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात 26 डिसेंबर रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका) दि. 19 :- नांदेड जिल्ह्यातील भूमि अभिलेख कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची समस्या मार्गी लावण्यासाठी सोमवार 26 डिसेंबर 2022 रोजी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड यांच्या कार्यालयात पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. ही अदालत सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत होणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख श्रीमती एस. पी. सेठीया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
भूमि अभिलेख विभागातून दिनांक 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती योजनेशी संबंधीत लाभाच्या काही समस्या असतील, त्या सोडविण्यासाठी ही पेन्शन अदालत आयोजित केली आहे. या पेन्शन अदालतमध्ये येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्या समस्या बद्दल लेखी म्हणणे आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड यांच्या कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख श्रीमती एस. पी. सेठीया यांनी केले आहे.