आशाताई बच्छाव
पुणे,उमेश पाटील युवा मराठा न्युज नेटवर्क लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कला, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय, ऐतिहासिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व वैशिष्टय़पूर्ण कामगिरी करनार्या मान्यवरांचा पार्थ पवार फाउंडेशनच्या वतीने मा.नगरसेवक राजाभाऊ बनसोडे यांच्या हस्ते “शरदरत्न २०२२” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यामध्ये हिरल हेडा (मिस महाराष्ट्र),सिद्धार्थ सूर्यवंशी (फुटबॉल),संगीताताई पाचंगे (पत्रकार),आरुष धर्मलिंगम (बॉक्सिंग),उमेश पाटील (पत्रकार),अनोष कांबळे (सॉफ्टबॉल),पियुष जललेला,मोहन गायकवाड (सरस्वती अनाथ आश्रम योग स्पर्धा),बाळासाहेब निकाळजे (फु-बाई-फु) यांना सन्मानित करण्यात आले याप्रसंगी सामाजिक,क्रिडा,कला क्षेत्रातील रत्नांची पारख करून योग्य निवड केली व “शरदरत्न ” पुरस्कार देऊन गौरव केला यामुळे समाजातील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींचे मनोबल वाढते या अप्रतिम आणि दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल विशेष अभिनंदन असे मत पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी कले.
आपल्या कर्तुत्वाची व यशाची घोडदौड कायम राहो पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे मनापासून अभिनंदन आणि व पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा असे मनोगत मा. नगरसेवक राजाभाऊ बनसोडे यांनी व्यक्त केले त्याप्रसंगी अल्बर्ट कोल्हे,जाफर शेख, अल्ताफ काझ,महेश वर्मा,नरेश सुतार संजय मगर,सिद्राम म्हेत्रे,शंकर गायकवाड,ॲलेक्स दास उपस्थित होते