Home नंदुरबार तळोद्यात ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’निमित्त काढण्यात आली भव्य वाहन फेरी

तळोद्यात ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’निमित्त काढण्यात आली भव्य वाहन फेरी

76
0

आशाताई बच्छाव

IMG-20221210-WA0103.jpg

तळोद्यात ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’निमित्त काढण्यात आली भव्य वाहन फेरी
माधव पावरा नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी
तळोदा – शेकडो हिंदू प्रेमींच्या सहभागाने तळोदा शहरातून आज शनिवार दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी काढण्यात आलेल्या वाहन फेरीने समस्त तळोदा वासीयांचे लक्ष वेधून घेतले. उद्या रविवार रोजी होणाऱ्या हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या निमित्त नागरिकांना आवाहन करण्यासाठी ही वाहन फेरी काढण्यात आली. प्रत्येक गल्लीत प्रत्येक चौकात धर्मध्वजाचे पूजन करून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आला.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ डिसेंबर २०२२ रोजी माळी समाज मंगल कार्यालय, तळोदा येथे सायंकाळी ५:३० वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात येणार आहे.
सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांड हे वक्ते म्हणून या सभेत मार्गदर्शन करणार आहेत. या सभेच्या ठिकाणी क्रांतीकारकांबद्दल माहिती देणारे फलक, साधना यांविषयी मार्गदर्शन करणारे फलक प्रदर्शन, तसेच जनजागृती करणार्‍या ग्रंथांचे विविध प्रदर्शनही लावण्यात येणार आहे. तसेच स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात येणार आहेत.

दरम्यान सभेसाठी तळोदा शहर परिसरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रसार चालू असून गेले महिनाभर विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ, लोकप्रतिनिधी यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. या अंतर्गतच सभेच्या प्रचारासाठी आज शनिवार दिनांक १० डिसेंबर या दिवशी वाहन फेरी काढण्यात आली . प्रारंभी धर्मध्वजाचे पूजन करून श्रीदत्त मंदिरापासून आरंभ करण्यात आला. नंतर काका शेठ गल्ली मार्गे बिरसा मुंडा चौकात आल्यावर श्री वसंत पाटील यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला माळ अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यानंतर वाहन फेरी पुढे निघाली. खानदेश गल्ली गणपती गल्ली ठाणे घर गल्ली मोठा माळीवाडा हनुमान मंदिर संविधान चौक एबी चौक या मार्गाने येऊन माळी समाज मंगल कार्यालयात वाहन फेरीची सांगता करण्यात आली. त्या ठिकाणी हिंदू जनजागृती समितीचे श्री अमोल दादा वानखेडे यांनी उपस्थित नागरिकांना अनमोल मार्गदर्शन केले. या वाहन फेरीत जवळपास 250 वाहनधारक सहभागी झाले होते.

Previous articleमहाराष्ट्रात 10 डिसेबंर ते 13 डिसेबंर दरम्याण पावसाचे वातावरण तयार होईल !
Next articleमुखेड नपा प्रशासनाचा अजब कारभार नारस्ता ना नाली ना लाईट अश्या मूलभूत सुविधेपासून काही नागरिक वंचीत.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here