आशाताई बच्छाव
वालसरा, (आमगाव) म. येथे विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून अंधश्रद्धेचा पर्दाफाश
नेहरू युवा केंद्र, शिवकल्याण संस्थेचा पुढाकार
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): अंधश्रद्धा ही आपल्या समाजाला लागलेली मोठी कीड आहे, अंधश्रद्धे मुळे अनेकांची फसवणूक होते तर बरेच वेळा अनेक निष्पाप लोकांचा जीवही जातो. त्यामुळे अंधश्रद्धा दूर करणे काळाची गरज आहे हे ओळखून नेहरू युवा केंद्र गडचिरोली युनिसेफ, शिवकल्याण युथ मल्टीपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सेवा कार्यक्रमा अंतर्गत चामोर्शी तालुक्यातील वालसरा व आमगाव महाल येथे “अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती” कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यादरम्यान विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्याकरिता प्रयत्न करण्यात आले. या कार्यक्रमाला आमगाव म. येथे विशेष अतिथी म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी राजकुमार निकम, नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे उपस्थित होते. तर मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य सहकार्य वाहक विलासराव निंभोरकर, म.अ.स.गडचिरोली कार्याध्यक्ष विठ्ठलराव कोठारे, म.अं.नि.स. गडचिरोली शहरकार्यवाहक उपेंद्र रोहनकर, म.अ.नि.स. प्रदान सचिव तथा सर्पमित्र प्रा. विलास पारखी उपस्थित होते. मान्यवरांनी विविध प्रात्यक्षिक दाखवून मनोरंजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत अंधश्रद्धा निर्मूलना करीता जनजागृती केली.
मुख्य अतिथी म्हणून शिवकल्याण संस्था अध्यक्ष अनुप कोहळे, आमगाव ग्रा.प. सदस्य सुभाष कोठारे, जी.प. शाळा वालसरा मुख्याध्यापक महेंद्र वासेकर, आमगाव पो.पा.साईनाथ गावतूरे आदी उपस्थित होते. शेकडो विद्यार्थी, युवक, युवती, महिला आणि नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जितेश शेट्टीवार, नीरज कोहळे, रोशन गट्टीवार, गजानन कुनाघाडकर, अश्विन गट्टीवार, सह नेहरू युवा केंद्र व शिवकल्याण संस्थेच्या पदाधकाऱ्यांनी पुढाकार घेतले.