आशाताई बच्छाव
शेतकऱ्याची वीज कनेक्शन बंद करणे तात्काळ थांबवा
शिवसेना किसान सेनेच्या वतीने संग्रामपूर तहसीलदारांना निवेदन.
ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
युवा मराठा न्यूज नेटवर्क संग्रामपूर
शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करणे तात्काळ थांबवा शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा द्या , पिक विम्याची रक्कम कोणतेही निर्बंध न लावता तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा या मागणीसाठी संग्रामपुर तालुका शिवसेना किसान सेनेच्या वतीने तहसीलदार यांना 5 डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले सदर दिलेल्या निवेदनात नमूद आहे की गत दोन ते तीन वर्षापासून सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी या प्रचंड नुकसानामुळे पिक विमा काढतो मात्र त्या शेतकऱ्याला पिक विम्याच्या मोबदल्यात तटपुंज रक्कम मिळत आहे पिक विमा काढण्यासाठी शासनाकडून जनजागृती करण्यात येते. मात्र ज्या प्रमाणात जनजागृती होते त्या प्रमाणात शेतकऱ्यांना पिक विम्याची तोकडी मदत मिळते. शेतकरी पिक विमा ची रक्कम भरत असलेल्या हप्त्याच्या तुलनेत शेतकऱ्यांना अगदी 50 ते 100 रुपये पिक विम्याची रक्कम पिक विमा कंपनीकडून देण्यात येत आहे त्यामुळे पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम कोणतेही निर्बंध न लावता
तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. तसेच खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहेत राज्य शासन आणि केंद्र शासन शेतकऱ्यांचे काही एक प्रश्न ऐकण्यास तयार नाही आहेत मुळातच विदर्भ हा आणि त्यातही बुलढाणा जिल्हा हा आत्महत्याग्रस्त झालेला म्हणून ओळखला जातो त्यामुळे हा प्रकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतो सोबतच रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणी देणे ओलितासाठी दिवसा वीज मिळणे आवश्यक आहे मात्र लोड शेडिंग सुद्धा सुलतानी जाताचा प्रकार करत आहे दिवसा लाईन मिळत नसली तरी रात्रपाळीवर शेतकरी पिकांना जीवदान देतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा विद्युत पुरवठा देण्यात यावा तसेच पिक विमा कंपन्यांच्या संदर्भात शासकीय यंत्रणे कडून हस्तक्षेप व्हावा शेतकऱ्यांना मोबदल्याची रक्कम द्यावी सोबतच नादुरुस्त झालेल्या रोहित्र शेतकऱ्यांना तात्काळ बदलून द्यावे शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने किमान आठ तास दिवसा वीज पुरवठा व्हावा अन्यथा आम्ही शिवसैनिक शिवसेनेच्या वतीने आंदोलनाचा पवित्रा घेऊ असा इशारा या निवेदनातून देण्यात आलेला आहे या निवेदनावर
उपतालुकाप्रमुख विजय भाऊ मारोडे ,शिवसेना किसान सेना तालुकाप्रमुख अमोल ठाकरे ,शुभम घाटे शहर प्रमुख संग्रामपूर , राहुल मेटांगे, दत्तात्रय मारोडे, धनंजय अवचार, नितीन भिसे, सुनील मुकुंद, रवींद्र मारोडे, विशाल बांगर, शेख अब्दुल शेख लुकमान, पुंडलिक खांजोड, अमोल बाळासाहेब देशमुख , दत्तात्रय सरीसे, शिवा इंगळे, अतुल बांगर, राजूभाऊ शेंडे, किसना भोंगरे गणेश ईगोकार ,अनिल वानखेडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.