Home गडचिरोली स्मृति उद्यान नागरीकांकरीता खुले करा रायुकाँ जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांची मागणी

स्मृति उद्यान नागरीकांकरीता खुले करा रायुकाँ जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांची मागणी

65
0

आशाताई बच्छाव

IMG-20221203-WA0019.jpg

स्मृति उद्यान नागरीकांकरीता खुले करा
रायुकाँ जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांची मागणी     गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
सोनापूर कॉम्प्लेक्स परीसरातील वनपर्यटन असलेला उद्यान तात्काळ सुरु करा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांनी केली आहे.
सोनापूर कॉम्प्लेक्स परीसरातील गडचिरोलीतील एकमेव वनपर्यटन असलेला उद्यान स्मृति उद्यानचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असल्यास तात्काळ सुरु करा, जेने करुन कॉम्प्लेक्स परीसरातील ज्येष्ठ नागरीकांना या उद्यानामध्ये सकाळ व सांयकाळला फिरता येणार तसेच शहरातील नागरीकांकरीता पर्यटन म्हणून उद्यानामध्ये कौटुंबिक परीवारासह फिरता येणार. तसेच उद्यानाच्या मार्फतीने महसूल गोळा होणार. वय वर्ष ५५ वरील ज्येष्ठ नागरीकांकरीता सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत व सायंकाळला ४ ते ६ वाजेपर्यंत उद्यानामध्ये फिरण्याकरीता कुठलाही शुल्क आकारु नये. कंत्राटदारामार्फत काम लवकरात लवकर पुर्ण करुन सुरु करावे, अशी मागणी पत्रकातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here