आशाताई बच्छाव
नायगाव येथे आठ हजार विद्यार्थ्यांनी गायले सामूहिक राष्ट्रगीत
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नायगाव (बा):
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने स्वराज्य महोत्सवाअंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन दिनांक 17 ऑगस्ट रोजी जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय नायगाव बाजार च्या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आले होते. समूह राष्ट्रगीत गाण्यासाठी नायगाव शहरातील व परिसरातील 14 शाळेतील जवळपास आठ हजार विद्यार्थ्यांनी समूह राष्ट्रगीत गायन सकाळी ठीक अकरा वाजता केले. नायगाव शहरासाठी विद्यार्थ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने एकत्रित येऊन राष्ट्रगीत गाण्याचा विक्रम झाला आहे. तहसील कार्यालय नायगाव व पंचायत समिती कार्यालय नायगाव तर्फे आयोजित केलेल्या या समूह राष्ट्रगीत गायनप्रसंगी नायगाव चे तहसीलदार मा. गजानन शिंदे, एज्युकेशन सोसायटी नायगाव चे सचिव प्रा. रवींद्र पाटील चव्हाण, गटविकास अधिकारी श्री वाझे साहेब, गट शिक्षणाधिकारी श्री माधव दुरनाळे, नायगाव नगरपंचायत समितीचे मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर, संतराम जाधव, नगराध्यक्ष प्रतिनिधी श्री जाधव, उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण,नायगाव नगरपंचायत येथील सर्व नगरसेवक व नगरपंचायत चे कर्मचारी , जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के. जी. सूर्यवंशी, शरदचंद्र कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. हरिबाबू, प्रा. बाबासाहेब शिंदे, प्रा. सुरेश जाधव, केंद्रप्रमुख उद्धव ढगे, हनवटे एन. एम., मिसे ए. बी., साधू एस. जी. , शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश पाटील, एम. जे. कदम, माजी गटशिक्षणाधिकारी अशोक पवळे,उपप्राचार्य प्रा प्रभाकर पवार, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. वरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख उद्धव ढगे व सय्यद अयुब सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. पि. डी. जाधव बारूळकर यांनी मानले. याचवेळी अवघ्या सहा वर्षाची चिमुकली कु. वीरा गणेश हाके पाटील या विद्यार्थिनीने देशभक्तीपर गीते गाऊन सर्व उपस्थितांची मने जिंकली.त्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला.
राष्ट्रगीत गायन कार्यक्रमासाठी म्युझिक व साऊंड सिस्टिम ची सुरेख व्यवस्था गणेश हाके पाटील व आनंदराव गायकवाड यांनी केली. वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.