आशाताई बच्छाव
कोरोना वैश्विक महामारीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र वाटप
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मागील दोन वर्षात आपल्या देशासह अख्ख्या जगाला हैराण वा सळो की पळो करून सोडलेला कोरोना वैश्विक महामारीत अनेकांचे संसार उद्धवस्त झाले या संकटातून अजुनही अनेकांना बाहेर निघता आलेलं नाही.अशा संकट काळी जिवाची पर्वा न करता लाखो कोरोना यौद्धानी समोर येवून फेस टू फेस काम केले यात पोलीस, शिक्षक,महानगरपालिका,नगरपालिका कर्मचारी,अनेक पक्ष,पत्रकार,संघटना यांनी जमीनीवर उतरुन काम केले परंतु याही पलीकडे जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना महामारीत उल्लेखनीय प्रयत्न व काम केले.
मुखेड तालुक्यातील आरोग्य कर्मचारी यात काही कमी नव्हते कारण कोरोना रुग्न वाढित व कमी करण्याच्या प्रयत्नात नांदेड जिल्ह्यात मुखेड हा वरचढ होता. त्यामुळे आपण केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल आरोग्य विभागामार्फत आरोग्य कर्मचाऱ्यांना आझादि का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ध्वजारोहण झाल्यानंतर प्रशस्तीपत्राचे वाटप करण्यात आले.प्रशस्तीपत्र दिल्याने कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण दिसत होते परंतु काम करत असताना अनेकांचे प्राणही गेले त्याची मागची आठवण त्या दिलेल्या प्रशस्तीपत्राने झाल्याचेही दिसून आले.
मुखेड तालुक्यातील सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले त्यातील सावरगाव पीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांना डॉ बालाजी गरुडकर यांच्या हस्ते आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड श्रीमती वर्षा ठाकूर घुगे मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड व डॉ बालाजी शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी हस्ताक्षर केलेले 2020-21या वर्षात जिल्हास्तरीय कोरोना (कोविड -19) वैश्विक महामारीत उल्लेखनीय प्रयत्न व कामगिरी करणाऱ्या उत्कृष्ट कर्मचारी म्हणून हे प्रशस्तीपत्र देण्यात आले.
यावेळी अधिकारी सर्व कर्मचारी वृंद व नागरीक उपस्थित होते.