आशाताई बच्छाव
पोस्टमन दादांनी आत्तापर्यंत 18 हजार बालकांची आधार कार्ड काढून दिले.
माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
राज्य शासनाकडून आधार कार्ड काढण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. सध्या डाक विभागातील पोस्टमन यांच्याकडे आधार कार्ड काढण्याची जबाबदारी दिली असून पंढरपूर डाक विभागातील पोस्टमन दादांनी आत्तापर्यंत 18 हजार बालकांची आधार कार्ड काढून दिले आहेत. तर या भागातून 46 हजार 158 आधार कार्डची दुरुस्ती करण्यात आली आहे. पंढरपूर डाक विभागाचे काम सहा तालुक्यातून होत असून यामध्ये पंढरपूर ,माळशिरस,माढा, करमाळा,सागोला, मंगळवेढा तालुक्याचा समावेश आहे
या सहा तालुक्यातून आधार कार्ड काढण्याचा उपक्रम पोस्टमनदादांकडून चांगल्या स्वरूपाचा प्रतिसाद मिळत आहेत, यासाठी शहर व ग्रामीण भागातील अंगणवाडी भेटी देवून अंगणवाडी सेविकांच्या मदतीने बालकांच्या आधार कार्ड काढून दिले जात आहेत