Home कृषिसंपदा ठेंगोडयाचे माजी उपसरपंच नारायण (देवा) निकम यांना उत्कृष्ट शेती पुरस्कार प्राप्त

ठेंगोडयाचे माजी उपसरपंच नारायण (देवा) निकम यांना उत्कृष्ट शेती पुरस्कार प्राप्त

64
0

आशाताई बच्छाव

IMG-20220710-WA0038.jpg

ठेंगोडयाचे माजी उपसरपंच
नारायण (देवा) निकम यांना
उत्कृष्ट शेती पुरस्कार प्राप्त
(गणेश अण्णा पगारे युवा मराठा न्युज नेटवर्क)
ठेंगोडा– येथील प्रगतशील शेतकरी व ठेंगोडयाचे माजी उपसरपंच नारायण (देवा) माधवराव निकम यांना उत्कृष्ट शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
इनरव्हिल क्लब आँफ सटाणा मिडटाऊनच्या पदग्रहण समारंभात हा पुरस्कार देऊन निकम यांचा सन्मान करण्यात आला.सीताफळ,डाळिंब,पपई तसेच टरबुज सारख्या पिकात नावीन्यपूर्ण बदल करुन आधुनिक पध्दतीने कमी खर्चात चांगले उत्पादन काढून दाखविणारे शेतकरी म्हणून निकम यांचा उत्कृष्ट शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देण्याबरोबरच सटाणा तालुक्यासह कसमादे भागातील शेतकऱ्यानी निकम यांच्या शेती आधुनिकीकरण पध्दतीचा अवलंब करावा असे मतही यावेळी इनरव्हिल क्लबच्या पदाधिका-यांनी निकम यांच्या सत्कार प्रसंगी मांडले.नारायण (देवा)निकम यांचे शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून,युवा मराठा न्युजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांनीही निकम यांचे खास अभिनंदन केले आहे.

Previous articleसंपादकीय…. बा विठ्ठला सदबुध्दी दे..!
Next articleपुढिल तीन दिवस जिल्हयात अतिवृष्टी होण्याची शक्यता
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here