आशाताई बच्छाव
मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडचे पहिले राज्यव्यापी ग्रामिण महाअधिवेशन पिंपळनेर येथे संपन्न
वासखेडी – पिंपळनेर येथील दमंडकेश्वर मंगल कार्यांलयाच्या सभागृहात मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडचे पहिले राज्य व्यापी ग्रामिण महाअधिवेशन संपन्न झाले.४जुनच्या या ऐतिहासीक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला सायंकाळी ५ वा.राजे छत्रपती इंग्लिश मिडीयम स्कुलच्या प्रांगणातुन भव्य शोभा यात्रा काढण्यात आली,भगव्या वेश परीधान करून जिजाऊ महिला सेनेने परीसरातील वातावरण भगवेमय केले,शोभायात्रेत जिजाऊंची ,पालखी,ग्रंथदिंडी, यासह शिवकालीन शस्त्रकला,विविध संदेश,देणारे देखावे या कार्यक्रमाची मुख्य प्रमुख वैशिष्टरहीत सादर करण्यांत आले होते,शोभा यात्रेच्या मार्गांवर विविध कल्पनेतुन साकारलेल्या रांगोळींनी विविध संदेशाने मने वळविली,मुख्य बाजारपेठेतुन अधिवेशनस्थळी यात्रेच्या समारोप करण्यांत आला, कार्यक्रमा प्रसंगी रात्रीच्या बहारदार सांस्कृतीक कार्यक्रमांत प्रबोधनात्मक ,लावणी,गोंधळ,भारूडे,गवळणे,नाटीका,आदी समृध्द लोककलेचे दर्शन घडवत अनमोल सादरीकरण करण्यांत आले,
५जुन रोजी औरंगाबाद येथील जिजाऊ ब्रिगेडने सकाळी प्रसिध्द शाहीरी जलसा कार्यक्रमा ने आनंदमय वातावरणात आपल्या जिजाऊंच्या महिला सेना असल्याचा अभिमान बाळगला,विविध मार्गदर्शनाची शिदोरी देखील यावेळी बघावयास मिळाल्याचा मनस्वी आनंद महीलांच्या चेहर्यावर दिसत होता,”शिवधर्मातील महिलांचे स्थान”या विषयांवर विविध मान्यवारांनी मार्गदर्शन केले,मराठा सेवा संघाच्या विचारधारनेनुसार “शिवविवाह” सोहळा देखील संपन्न झाला,सायंकाळी विविध क्षेत्रतील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणारा “जिजाऊ रत्न “जिजाऊ गौरव”पुरस्कार देवुन गौरविण्यात आले, समारोपीय सत्रात मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगपुरुष अड,पुरूषोत्तम खेडेकर यांच्यासह शिवधर्म समन्वयक माझी आमदार रेखाताई खेडेकर,मराठा सेवा संघ प्रदेशाध्यक्ष इंजि,विजय घोगरे,यांचे प्रमुख मार्गदर्शन पर जिजाऊ ब्रिगेडचे विचार व महत्वपुर्ण योगदानासाठी आपल्या विचारातुन जनतेला संबोधित केले,महाअधिवेशनात मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड,आदींनी आपली भुमिका ,कार्यक्रमा ची मुख्य संकल्पना तथा मुख्य भुमिकेतुन महाअधिवेशन यशस्वी पारीत केले,
प्रसंगी विविध समित्या देखील गठीत करण्यांत आल्या होत्या ,महिला प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हातात घेत पहिले भव्य ग्रामिण भागातील जिजाऊ ब्रिगेडचे पहीले महाअधिवेशन यशस्वी करण्याचा बहूमान जिजाऊ ब्रिगेडच्या महीला प्रदेशाध्यक्षा शिवमती माधुरी भदाणे,यांनी केला,राज्यातील जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यां मध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण प्रसंगी पहावयास मिळाले,या महाअधिवेशनात महीला सहपरीवार मोठ्या संख्येने उपस्थिति लावली,या अधिवेशना प्रसंगी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा, व सत्कारमुर्ती चा सत्कार करण्यात आला, प्रसंगी आलेल्या मान्यवरा़ंचे तसेच परीसरातील शिवमतींचे ,नागरीकांचे आभार देखील मानले