आशाताई बच्छाव
शहादाच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात, घाणीच्या साम्राज्याने मानव वस्ती ची जागा व्यापली. नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी. सागर कांदळकर नारायण नगर , शहादा : आत्ता पावसाळा सुरू डेंग्यू,मलेरिया ,असे घातक आजारांचा फैलाव होत असताना शहाद्यातील नारायण नगर, तसेच सप्तशृंगी माता मंदिर परिसरात व अंकलेश्वर बुऱ्हानपूर रोड ह्या परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या ठिकाणी स्वच्छ व सुंदर गाव ही संकल्पना कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. गटारी तुडुंब भरलेल्या असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ठीग पसरले आहे. प्लास्टिकसह गटारीत वाढलेली घाण, भर रस्त्यावर जागोजागी पडलेली घाण हे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे मागेच मोठा सांडपाण्याचा नाला असून नागरीक डेंग्यू, मलेरिया व कोरोना सारख्या आजारांना देखील बळी पडू शकतात.कचरा कुंड्यांची दुरावस्था, कचरा कुंड्या ठेव ठेवलेल्या असून त्यांची देखील दुरवस्था झालेली आहे. रस्त्यावरच मोठा ढिगारा तयार होतो कॅरीबॅगचा सर्रास होते वापरपर्यावरणाच्या दृष्टीने राज्य सरकारने राज्यात प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. प्लास्टिक विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद असताना संबंधित विभागाकडून आदेशाची पायमल्ली होत असून एक-दोन थातूरमातूर कारवाई करून प्लास्टिक विक्रेत्यांवर आता मेहरबानी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्लास्टिकचा रोज वापर सुरू असून शाहादा मधील दुकानांवर व भाजी विक्रेत्यांकडे प्लास्टिकच्या कॅरीबॅग उपलब्ध असून ग्राहकांना त्या दिल्या जात आहे. यामुळे , कचºयामध्ये प्लॅस्टीकच्या बॅगच मोठ्या प्रमाणात आढळून येतात . काळजी घेतली जाईल !गावातील स्थितीबाबत शाहादा येथील ग्राम विकास अधिकारी व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गावात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. मात्र काही ठिकाणी स्वच्छता करणे राहिले असल्यास प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेची काळजी निश्चितच घेतली जाईल.