राजेंद्र पाटील राऊत
तेल्हारा ग्राम बाल संरक्षण समिती प्रशिक्षण कार्यशाळेत
113 अंगणवाडी सेविका व 22 पोलीस पाटील यांचा सहभाग
अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : तेल्हारा तहसील कार्यालयाच्या सभागृहांमध्ये (शुक्रवार दि.20 रोजी) जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा तालुक्यामधील गाम बाल संरक्षण समितीच्या सदस्य सचिव अंगणवाडी सेवीका व सदस्य पोलीस पाटील याचे प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळे मध्ये 113 अंगणवाडी सेवीका व 22 पोलीस पाटील यांनी प्रशिक्षण घेतले.
ग्राम बाल संरक्षण समित्या अधिक सक्षम व्हाव्यात, या करीता गाम बाल संरक्षण समितीची भुमिका,रचना व कार्य तसेच कायद्यांची माहिती व्हावी यासाठी तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे.
तेल्हारा तालुका प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बालन्याय मंडळ सदस्य अॅड. वैशाली गावंडे, नायब तहसीलदार गुरव उपस्थित होते.
या कार्यशाळे मध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल लाडुलकर, तालुका संरक्षण अधिकारी सुनिल सरकटे, अतुल चव्हाण, नितीन अहीर,सतिश राठोड, संगिता अभ्यंकर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे संचालन सतिश राठोड यांनी तर आभार प्रदर्शन रेश्मा गुरूमकार यांनी केले. यावेळी सचिन घाटे, योगेंद्र खंडारे, रेवत खाडे, अजय पोहनकर, अमोल तळोकार, सुनिता गावत्रे, सुरेखा शेगोकार यांचे सहकार्य लाभले.