राजेंद्र पाटील राऊत
अवैध रेती वाहतूक करणाऱ्यानो न्यायदेवता तुम्हाला सोडणार नाही! बुलडाणा न्यायालयाने दोघांना अशी अद्दल घडवली की, रेती चोरीचा विचार त्यांच्या स्वप्नातही येणार नाही!
ब्युरो चिफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
बुलडाणा -: विना परवाना रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना बुलडाणा न्यायालयाने २ वर्षें सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. काल,२४ मे रोजी न्यायालयाने हा निकाल दिला.
gode
बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय सैय्यद मजहर हे मागील १५ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांनी तांदुळवाडी फाट्याजवळ धाड येथून येणाऱ्या( एम एच २८- एबी ७६१६ क्रमांकाच्या) टिप्परला अडविले. वाहनातील बळीराम पांडूरंग उबरहांडे व विष्णू सुखदेव गावंडे ( रा. खासगाव, ता. जाफराबाद, जि. जालना) यांच्याजवळ कोणताही परवाना नसल्याचे व वाहनात ३ ब्रास रेती असल्याचे आढळून आले. त्यांच्याविरुद्ध बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रकरणी एएसआय सखाराम कोरडे यांनी तपास करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल देशपांडे यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. खटल्यात सहाय्यक सरकारी वकील प्रभाकर मंगळकर यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद, ५ जणांची साक्ष लक्षात घेऊन न्यायाधीशांनी दोघा आरोपींना दोन वर्षांचा करावास व ९० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आरोपींना आणखी ६ महिने साधी कैद भोगावी लागणार आहे.