राजेंद्र पाटील राऊत
बार्शी टेक्स्टाईल मिल्स बार्शी, पुन्हा सुरू करण्यासाठी, माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन दिले.
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा चीफ बीरो महादेव घोलप.
बार्शी टेक्स्टाईल मिल्स ही भारत सरकारच्या अधिपत्याखाली चालत असलेले उद्योग घटक असून, ही मिल २३ मार्च २०२० पासून कोविड महामारी मध्ये बंद करण्यात आलेली आहे. त्यानंतर देशातील सर्व उद्योग चालू करण्यात आले आहेत, परंतू आज मित्तीपर्यंत बार्शी टेक्स्टाईल मिल्स चालू करण्यात आलेली नाही. याबाबत मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री मा. पीयूषजी गोयल साहेब यांच्याशी बोलून, या बाबतीत लक्ष घालून मिल चालू करण्यासंदर्भात प्रयत्न करावेत अशी विनंती मी, माजी नगरसेवक विलास आप्पा रेनके, राष्ट्रीय गिरणी कामगार संघ बार्शीचे जनरल सेक्रटरी नागनाथ सोनवणे व रामेश्वर सपाटे यांनी निवेदनाद्वारे केली.