राजेंद्र पाटील राऊत
पाणिप्रश्न पेटला संगितराव भोंगळ यांनी उपसले उपोषणअस्त्र
पातृर्डा ग्रामस्थांचा पाणीबाणीचा लढा!
बुलढाणा,(स्वप्नील देशमुख ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
पातृर्डा वासियांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या पाणिप्रश्न आता ज्वलंत बनला असुन आज दि.५ एप्रिल पासुन जि.प.चे माजी उपाध्यक्ष संगितराव उपाख्य राजु पाटिल यांनी लोकशाही मार्गाने उषोषणअस्त्र उगारले आहे. या उपोषणाला समस्त ग्रामस्थांचे समर्थन मिळत असल्याने हा “पाणिबाणी” लढा ज्वलंत रुप घेत आहे.
पातृर्डा वासियांच्या भविष्यातील ५० वर्षे मुबलक व शुध्द पाणी मिळावे यासाठी मागिल ५ ते ६ वर्षांपासुन संगितराव भोंगळ यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनात गावकर्यांचा संघर्ष सुरु होता. अनथ प्रयत्नांनी या पाणीसंघर्षांची फलश्रृती होवुन पातृर्डा गावाकरिता २ कोटी ३१ लाख ८१ हजारांची पाणिपुरवठा योजना मंजुर करण्यात आली. मात्र, अत्यंत जिव्हाळ्याचा हा प्रश्न असतांना संबधित विभागाच्या अधिकार्यांनी उपरोक्त पाणिपुरवठा योजनेची निविदा अडकवून ठेवत गावकर्यांच्या आनंदावर विर्जण टाकले.
याबाबत संबधित विभागाला वारंवार सुचना,विनंती व प्रत्यक्ष चर्चेनंतर सुध्दा हा प्रश्न सुटत नसल्याने अखेर संगितराव भोंगळ यांचे नेतृत्वात उपोषण सुरु केले. पातृर्डा गावाकरिता ग्रामिण पाणिपुरवठा विभागाने जलजिवण मिशन अंतर्गत योजना मंजुर झालेली आहे.
सद्याच्या परिस्थितीत पाणी टाकी व पाईप लाईन ची अवस्था अत्यंत जिर्ण स्वरुपाची असल्याने नव्याने मंजुर झालेल्या योजनेअंतर्गत काम तत्काळ सुरु व्हावे अशी मागणी संगितराव भोंगळ यांची असतांना प्रस्तावित कामाला तांत्रिक मंजुरात असुन देखील सदर कामास म.जि.प्रा ने स्वताःच्या कृती आराखड्यात प्रस्तावित करुन गोंधळ निर्माण करत पाणिपुरवठा योजनेचे काम थांबविले. व उपरोक्त कामाची निविदा अडवुन ठेवली.
परिणामी लोकशाही मार्गाने उपोषण करत असल्याचे संगितराव भोंगळ यांनी माध्यमांना सांगितले.
या प्रश्नासंदर्भात दि.१५ मार्च रोजी गावकर्यांना सभेच्या माध्यमातुन संबोधित करत संगितराव भोंगळ यांनी या योजनेबाबत कशा पध्दतीने संबधित विभाग अडवणुक करत निविदा थांबविल्याने प्रशासनाला जागे करण्यासाठी अखेरीस उपोषणाच्या माध्यमातुन हा पाणीसंघर्ष सुरु ठेवु व जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत मागे हटणार नाही अशा ईशारा संबधित विभागाला संगितराव भोंगळ यांनी दिला.
या संदर्भात दि.१७ फेब्रु.रोजी महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डाॕ.राजेंद्र शिंगणे पत्राद्वारे संबधित विभागाला सदर कामाची फेर ई निविदा प्रसिध्द करुन काम तत्काळ सुरु करण्याचे स्पष्ट शब्दात निर्देश दिले आहेत.मात्र, संबधित विभागाचे अधिकाऱ्यांनी निविदा सोडणे आवश्यक असतांना दुर्लक्ष करत पातृर्डा वासियांच्या पाणिसंघर्षांची थट्टा चालविली आहे.
त्यामुळे उपरोक्त मंजुर झालेली पाणिपुरवठा योजना संबधित विभागाच्या अधिकार्यांनी त्यांचे स्तरावरुन आदेश देत निविदा सोडत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. अशा आशयाचे पत्र दि.२९ मार्च रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आले होते. उपरोक्त पत्रात ५ एप्रिल पासुन आमरण उपोषण करुन असा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने आज पासुन आमरण उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे.
न्याय मिळेपर्यंत माघार नाही-संगितराव भोंगळ
हा नुसता पाणिप्रश्न नाही तर भविष्यातील ५० वर्षांचे गावकर्यांचे भविष्य आहे. मागिल ५ ते ६ वर्षापासुन शासन व प्रशासनाला यांचे गांभिर्य लक्षात आणुन दिले.या संघर्षांची फलश्रृती होवुन २ कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला सर्व काही व्यवस्थित असतांना संबधित विभागाचे अधिकारी निविदा अडवुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करत नसल्याने आमरण उपोषण करत आहोत असे संगितराव भोंगळ यांनी स्पष्ट केले.
आज गावातील पाण्याची टाकी व पाईपलाईन जिर्ण अवस्थेत असतांना सर्व गावकर्यांना मुबलक स्वरुपात पाणी उपलब्ध होत नाही मात्र, ही योजना कार्यान्वित झाल्यास भविष्यातील ५० वर्षे प्रत्येक कुटुंबाला शुध्द व मुबलक पाणी मिळेल हा माझ्या व ग्रामस्थांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्यामुळे जो पर्यंत न्याय मिळणार नाही तो पर्यंत माघार घेणार नसल्याची रोखठोक भुमिका संगितराव भोंगळ यांनी घेतली आहे