• Home
  • वाशिम जिल्ह्यात बेकायदेशीर जनावरे वाहतुक करताना वाहन पकडले;ग्रामस्थांच्या जागरुकपणामुळे वाहन पोलिसांच्या ताब्यात

वाशिम जिल्ह्यात बेकायदेशीर जनावरे वाहतुक करताना वाहन पकडले;ग्रामस्थांच्या जागरुकपणामुळे वाहन पोलिसांच्या ताब्यात

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220319-WA0079.jpg

वाशीम ( गोपाल तिवारी ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे जनावरांनी कोंबून भरलेली पाच वाहने ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. या वाहनावरील जनावर कत्तलीसाठी नेत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
एकुने ३२ नग बैलगोरे गोवांश व ५ वाहने असा एकूण १७,७०,००० रुपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ३२ बैलगोरे पुढील देखभाल व उपचाराकरिता श्री पांजरापोळे संस्थान कारंजा गोरक्षण येथे जमा करन्यात आले आहे व गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.
सदरचा कारवाई पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनात धनज पोलीस ठाण्याचे फौजदार अनिल ठाकरे व सहकारी करत आहेत.

anews Banner

Leave A Comment