राजेंद्र पाटील राऊत
३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी, एक हजार तलाठ्यांची लवकरच भरती.. ! महसूलमंत्री यांची विधानसभेत घोषणा..!
मुंबई : (अंकुश पवार, मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून राज्यातील सरकारी नोकरी ची वाट पाहत असलेल्या मुलांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी खुषशबर दिली आहे. सोमवारी विधानसभेत महसूल मंत्री यांनी दिली.
राज्यात तलाठ्यांच्या जागा मोठ्याप्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन ३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठ्यांची भरती करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी विधानसभेत दिली.
कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मूळ हवेली कार्यालय आणि अपर तहसील कार्यालय पिंपरी-चिंचवड या कार्यालयांमार्फत सद्यःस्थितीत कामकाज सुरू आहे.
लोणी काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे. १६० गावांमध्ये ४६ तलाठी कार्यरत आहेत.
३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असून, याअंतर्गत संबंधित भागातील तलाठ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असेही थोरात यांनी सांगितले.