
राजेंद्र पाटील राऊत
पुतिन यांची कूटनीती, युक्रेनला चारी बाजूने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न ..! शहराला चारही बाजूंनी फौजांचा वेढा, पाणीपुरवठा, वीजपुरवठा खंडित करा
मुंबई (अंकुश पवार, मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)
मारिउपोल या अझोव्ह समुद्रावरील मोठ्या शहराला रशियन फौजांनी चारही बाजूंनी वेढा घातलाय. या शहरामधील वीजपुरवठा खंडित करण्यात आलाय. पाण्याचा पुरवठाही थांबवण्यात आला आहे. (युद्धाच्या लाइव्ह अपडेट्ससाठी येथे क्लिक करा) असं असतानाच रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी हे युद्ध आम्ही केलेल्या नियोजित प्लॅनप्रमाणेच लढलं जात असल्याचा दावा केलाय.
“युक्रेनमधील विशेष लष्करी कारवाई नियोजनानुसार सुरु आहे. नियोजित वेळापत्रकानुसारच कारवाई होत आहे. आतापर्यंत ठरवलेल्या सर्व गोष्टी हव्या तशाच पार पडल्यात,” असं पुतिन यांनी सुरक्षा परिषदेच्या भाषणादरम्यान म्हटलं. हे भाषण राष्ट्रीय टीव्हीवरुन प्रसारित करण्यात आलं. हा महत्वाच्या शहराला ताब्यात घेण्यासाठी रशियाकडून पाणीपुरवठा बंद करण्याबरोबरच वीजपुरवठाही बंद करण्यात आलाय. विशेष म्हणजे एकीकडे मूलभूत सेवा खंडित करण्यासोबतच दुसरीकडे सातत्याने या शहरावर हवाई हल्ले रशियाकडून केले जात आहेत.
रशियन सैन्याकडून मारिउपोला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून पाण्याचा पुरवठाही रोखण्यात आलाय. तसेच शहरावर सातत्याने बॉम्ब वर्षाव होत असल्याने स्थानिकांना शहर सोडता येत नाहीय, असं युक्रेनमधील स्थानिक प्रशासनाने म्हटलंय.
युक्रेनवर हल्ला करुन एक आठवड्याचा कालावधी झालाय. मारिउपोलवर सुरु असणाऱ्या हल्ल्यांची तुलना येथील स्थानिक प्रशासनाने आणि महापौरांनी नाझीच्या काळात झालेल्या हल्ल्यांशी केलीय.
मारिउपोल या अझोव्ह समुद्रावरील मोठय़ा शहराला रशियन फौजांनी घेरले असल्याचे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. खेरसन या दुसऱ्या महत्त्वाच्या बंदरातील परिस्थती अद्याप अस्पष्ट आहे. सुमारे ३ लाख लोकवस्तीचे शहर असलेल्या खेरसनवर संपूर्ण नियंत्रण मिळवल्याचा दावा रशियन फौजांनी केला आहे. रशियन आक्रमणाला बळी पडणारे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे शहर असावे. याशिवाय लिसा होरा जिल्ह्यातील एका प्रक्षेपण केंद्रावर हल्ला चढवल्याचा दावाही रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला.
युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांनी एका दृश्यफीत भाषणात युक्रेनच्या नागरिकांना प्रतिकार सुरू ठेवण्याचे आवाहन केले. आक्रमण करणाऱ्यांना एक क्षणही शांतता लाभू न देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.