राजेंद्र पाटील राऊत
व-हाणेपाडा सोनज परिसरात
बिबटयांचा सुळसुळाट शेतकऱ्यांवर
बिबटयांचा हल्ला
सोनज,(शितल बच्छाव प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- मालेगांव तालुक्यातल्या व-हाणेपाडा सोनज परिसरात बिबटयांचा सुळसुळाट वाढल्याने रात्रीच्या वेळेस शेतात कामे करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या भागात सोनज्या डोंगर असून वनप्रवण क्षेत्र असल्याने,गेल्या दोन चार दिवसापासून या भागात बिबटयाचा वावर असल्याची नागरिकात चर्चा होती,मात्र त्यास अफवा असल्याचे समजून शेतकरी व नागरिकांनी त्याकडे कानाडोळा केलेला होता.मात्र काल गुरुवारी रात्री व-हाणेपाडा गावाच्या शिवारात शेतात कांद्याना पाणी देत असलेल्या शेतकरी बारकू बच्छाव यांचेवर बिबटयाने अचानक हल्ला चढविल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे.दरम्यान वनविभागाने या भागात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.