Home उतर महाराष्ट्र पिंपळगाव बसवंत येथे अल्पवयीन मुलाची आत्महत्या

पिंपळगाव बसवंत येथे अल्पवयीन मुलाची आत्महत्या

143
0

राजेंद्र पाटील राऊत

पिंपळगाव बसवंत येथे अल्पवयीन मुलाची आत्महत्या
सागर कटाळे युवा मराठा न्युज नेटवर्क चॅनेल नाशिक ब्युरो चीफ                                                                     पिंपळगाव बसवंत येथील पिंपळगाव हायस्कूलच्या मागील बाजूस पियुष सुनील गायकवाड (वय १६) या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पिंपळगाव हायस्कुल मागील बाजूस असलेल्या कंम्पाऊडला कोळीवाडा येथील रहिवाशी पियुष सुनील गायकवाड (वय १६) या अल्पवयीन मुलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. रविवारी (दि. २३) सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रामदास गांगुर्डे तपास करीत आहेत.

Previous article100 रुपयांच्या बॉण्डवर कुटुंबातील सदस्यांच्या नावे जमीन हस्तांतरीत करा – शिवशंकर पाटील कलंबरकर.
Next articleमुरूमाच्या वाहन परवाना वरील गाडी क्रमांकाची नोंद रद्द करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here