Home नांदेड 100 रुपयांच्या बॉण्डवर कुटुंबातील सदस्यांच्या नावे जमीन हस्तांतरीत करा – शिवशंकर पाटील...

100 रुपयांच्या बॉण्डवर कुटुंबातील सदस्यांच्या नावे जमीन हस्तांतरीत करा – शिवशंकर पाटील कलंबरकर.

941
0

राजेंद्र पाटील राऊत

100 रुपयांच्या बॉण्डवर कुटुंबातील सदस्यांच्या नावे जमीन हस्तांतरीत करा –
शिवशंकर पाटील कलंबरकर.

नांदेड /मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क
-स्वतःच्या नावे असलेली जमीन आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावे करण्यासाठी शेतकऱ्यांना आज,हजारो-लाखो रुपय मोजावे लागत आहेत.स्वतःची जमीन स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावे करण्यासाठी,मोजावे लागणारे हजारो-लाखो रुपय ही त्या व्यक्तींची लूट आहे,ही लूट थांबली पाहिजे.100 रुपयांच्या बॉण्डवर संमतीपत्र घेऊन कुटुंबातील व्यक्तींच्या नावे जमीन हस्तांतरीत करण्याचे आदेश द्या,अशी मागणी दिनांक 24 जानेवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवाजिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी निवेदनातून केली आहे.
स्वतःच्या नावावरील जमीन आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावे करण्यासाठी हजारो-लाखो रुपय घेणे,ही शेतकऱ्यांची सरळ-सरळ लूट आहे.ही लूट थांबली पाहिजे.100 रुपयांच्या बॉण्डवर संमतीपत्र घेऊन कुटुंबातील व्यक्तींच्या नावे जमीन हस्तांतरीत करण्याचे आदेश विभागीय आयुक्त कार्यालयाने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाला द्यावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.या आदेशामुळे शेतकऱ्यांची हजारो-लाखो रुपयांची लूट थांबणार आहे.

Previous articleराज्य अंधारात गेलं तर काँग्रेस जबाबदार नाही, महाविकास सरकार असेल : उर्जा मंत्री यांची नाराजी उघड
Next articleपिंपळगाव बसवंत येथे अल्पवयीन मुलाची आत्महत्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here