राजेंद्र पाटील राऊत
मारहाणीच्या अंगावर जखमा असलेल्या युवकाने झुडूपाला फाशी घेतल्याचा बनाव; अभोणा येथील घटना
कळवण (राजेंद्र पाटील राऊत/बाळासाहेब निकम युवा मराठा न्युज नेटवर्क)-अभोणा ता.कळवण येथील ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षाच्या बाहेर असलेल्या एका छोटयाशा असलेल्या फुलझाडाच्या झुडूपाला आत्महत्या केलेल्या अवस्थेत एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली असून,विविध तर्क वितर्क या आत्महत्या घटनेवरुन निर्माण होत आहेत.
पोपट साहेबराव महाले रा.इन्शी ता.कळवण वय ३० असे या युवकाचे नाव असून,या युवकाच्या अंगावर मारहाणीच्या गंभीर स्वरुपाच्या जखमा असून भाऊबंदानी आपल्याला मारहाण केल्याची प्राथमिक स्वरुपाची तक्रारही या युवकाने अभोणा पोलिस स्टेशनला दाखल केलेली असल्याचे समजते.तर या तरुणाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे असले तरी,राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी काल शनिवारी प्रत्यक्ष अभोणा ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन,संबधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून याप्रकरणाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता,संबंधित समाधानकारक उतरे देऊ शकलेले नाहीत.त्यामुळे या आत्महत्या प्रकरणाचे नेमके गौडबंगाल काय? या प्रकरणातील सत्यता उघड करून असलेले काळेबेरे उघड करुन बनवाबनवी करणाऱ्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी करण्याच्या मागणीसाठी व गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्यासाठी राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या वतीने उद्या सोमवारी शासन दरबारी तक्रारी दाखल करण्यात येऊन न्यायासाठी आंदोलनात्मक भुमिका घेतली जाणार आहे.
कथित आत्महत्या केलेल्या झुडूपाला दिली भेट
दरम्यान साहेबराव महाले यांनी आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण करणाऱ्या झुडूपाला देखील यावेळी राजेंद्र पाटील राऊत यांनी भेट देऊन पाहणी केली असता,या झुडूपावर आत्महत्या करणेच शक्य नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.राजेंद्र पाटील राऊत यांचे समवेत यावेळी युवा मराठा न्युजचे विभागीय संपादक निलेश भोये,मुल्हेर प्रतिनिधी गोपीनाथ भोये,पंडीत भोये,व इन्शी गावातील महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.