Home नांदेड अडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा शिवशंकर पाटील कलंबरकर मुखेड कृषी उत्पन्न...

अडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा शिवशंकर पाटील कलंबरकर मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे दुर्लक्ष.

239
0

राजेंद्र पाटील राऊत

अडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा
शिवशंकर पाटील कलंबरकर

मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे दुर्लक्ष.

मुखेड प्रतिनिधी /मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद बाराहाळी जांब बु मुखेड शहरातील आडत व्यापाऱ्याकडून सोयाबीन सह शेतमाल खरेदी करताना मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे दुर्लक्ष होत असून शासनाचे संबंधित व्यापार्‍यावर कारवाई करून शेतकर्‍यांची लूट थांबवावी अन्यथा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा
स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा जिल्हा अध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी दिला यासंबंधी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव पवार यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले की तालुक्यातील आडत व्यापाऱ्याकडून सोयाबीन शेतमाल खरेदी करताना शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे जास्तीची कट्टी घेणे वजनात फरक करणे भावात फरक करणे अशा तक्रारी शेतकरी वर्गातून येत आहेत याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्याला प्रत्यक्ष भेटून होत असलेल्या प्रकारची माहिती दिली पण या संबंधी कारवाई करण्यात आली नाही तालुक्यात शेतकऱ्यांची होणारी लूट तात्काळ थांबवावी शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here