Home माझं गाव माझं गा-हाणं जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना नवनाथ जगताप यांनी शपथ देऊन केला...

जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना नवनाथ जगताप यांनी शपथ देऊन केला दक्षता जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ

308
0

राजेंद्र पाटील राऊत

जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना नवनाथ जगताप यांनी शपथ देऊन केला दक्षता जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ

 

पालघर , (वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)-: सार्वजनिक जीवनामध्ये लोकसेवकांनी प्रामाणिकपणे तसेच पारदर्शकपणे जनतेची कामे करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मान्यवरांच्याउपस्थितीत अधिकारी व कर्मचारी यांना सामूहिक रित्या शपथ अँटी कॅरपशन विभागाचे पोलीस उपाधीक्षक नवनाथ जगताप यांनी दिली .“जीवनाच्या सर्व क्षेत्रात सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन, लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही, सर्व कामे प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पध्दतीने करेन, जनहितासाठी कार्य करेन” अशी प्रतिज्ञा घेऊन भ्रष्टाचाराविरुध्द जनजागृती होण्याच्या उद्देशाने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियोजन सभागृहामध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. सकाळी 11.00 वाजता सहाय्यक जिल्हाधिकारी अशिमा मित्तल,निवासी उपजिल्हाधिकारी किरण महाजन आणि अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस उपधीक्षक नवनाथ जगताप उपजिल्हाधिकारी संदीप पवार,
स्वपन बिश्वास, पोलीस निरीक्षक, अँन्टी करप्शन ब्यूरो पालघर व सर्व स्टाफ आणि शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दरवर्षी 31 ऑक्टोंबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते , या जयंती सप्ताहात दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा यांबद्दलच्या दृढनिश्चयाचे बळकटीकरण करण्यासाठी नागरिकांच्या सहभागाने हा सप्ताह साजरा करण्यात येतो. यंदाच्या 2021 या वर्षी हा सप्ताह केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार दिनांक 26 ऑक्टोबर 2021 ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या दक्षता जनजागृती सप्ताहाचे बोधवाक्य “स्वतंत्र भारत @75 : सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे” असे आहे.

पोलीस उप अधीक्षक नवनाथ जगताप यांनी यावेळी महाराष्ट्राचे मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व मा. मुख्यमंत्री, उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जनतेला दिलेल्या संदेशाचे वाचन केले. त्यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली.

Previous articleतब्बल 75 जणांनी लग्न मंडपातच घेतली कोरोना लस. कर्मचाऱ्यांना वाजत गाजत नेले लग्न मंडपात. अनोख्या उपक्रमाची तालुकाभर चर्चा.
Next articleचिमूकल्याची मने जिकली” रोटरी क्लब कडून अनोखी भेट.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here