Home मराठवाडा आमदार मेघना दिपक साकोरे बोर्डीकर यांचा अनोखा उपक्रम, युनिसेफ व दीपस्तंभ आयोजित,...

आमदार मेघना दिपक साकोरे बोर्डीकर यांचा अनोखा उपक्रम, युनिसेफ व दीपस्तंभ आयोजित, “बाल विवाह मुक्त जिल्हा,, मोहीमेचे ऑनलाईन उद्घाटन.

593
0

राजेंद्र पाटील राऊत

आमदार मेघना दिपक साकोरे बोर्डीकर यांचा अनोखा उपक्रम, युनिसेफ व दीपस्तंभ आयोजित, “बाल विवाह मुक्त जिल्हा,, मोहीमेचे ऑनलाईन उद्घाटन.

परभणी,(शत्रुघ्न काकडे पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-
बालविवाह होण्याची संख्या परभणी जिल्ह्यात सर्वाधिक आहे. बालविवाह रोखण्यासाठी आम्ही प्रथम, युनिसेफ व आमच्या दीपस्तंभ मार्फत मूलभूत काम करण्याचे ठरविले आहे. बालविवाह रोखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढं यायला हवं. समाजातील ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, डॉक्टर, वकील यांनी जाणीवपूर्वक लक्ष द्यावं, सामाजातील सुज्ञ नागरिक अभ्यासक यांची मदत घ्यावी. निरोगी समाजासाठी आपल्याला दोन पावलं चालून पुढे यावच लागेल, करिता आम्ही आपल्या सोबत आहोत.असे आमदार मेघना दिपक साकोरे बोर्डीकर म्हणाल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी (जिल्हाधिकारी) आंचलजी गोयल, उद्घाटक (बाल विवाह अभ्यासक) हेरंब कुलकर्णी, प्रशिक्षक (प्रकल्प प्रमुख C.S.B.C.C) मिना कुमारी
प्रमुख उपस्थिती (Dy CEO WCD) मा. विशाल जाधव, (माजी तहसीलदार,जिंतूर) राम बोरगावकर आदींच्या हस्ते या अनोख्या उपक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here