राजेंद्र पाटील राऊत
ओला दुष्काळ जाहीर करा. आमदार डॉ.तुषारजी राठोड यांची मदत व पुनर्वसन मंत्री श्री विजय वडेट्टीवार साहेब यांच्याकडे मागणी.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा.ना.श्री.विजय वडेट्टीवारजी साहेब यांची मंत्रालयात भेट घेऊन मुखेड कंधार, लोहा- कंधार मतदारसंघ व नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना पिकविमा मंजूर करावा.अशी मागणी आ.डॉ.तुषार राठोड साहेब यांनी केली आहे.
1) मागील एक महिन्यांपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन,उडीद,मूग,कापूस, ज्वारी, इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
2) या नुकसानीमुळे नांदेड जिल्ह्यातील मुखेड- कंधार/ लोहा कंधार व जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे.
3) सध्या होत असलेले पंचनामे रद्द करून सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी कार्यसम्राट आमदार डॉ.तुषार राठोड यांनी महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री विजय वडेट्टीवार यांना निवेदनाद्वारे केली. यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड साहेब उपस्थित होते.