राजेंद्र पाटील राऊत
निसर्ग प्रेमींनी केला समुद्र किनारा स्वच्छ. पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज)
समुद्रावर केमिकल युक्त घन कचरा हा खोल समुद्रातून किनाऱ्यावर येऊन साचून राहतो तोच कचरा येणाऱ्या पर्यटकासाठी त्रास दायक ठरत आहे. शिरगाव गावातील स्थानिक निसर्ग प्रेमींनी या किनाऱ्यावरील केमिकल युक्त घन कचरा साफ करून एक आदर्श स्थापन केला आहे. या केमिकल घन कचऱ्याचे समुद्रातील जीव सृष्टीला मोठा धोका पोहचत असल्याचे आढळून येत आहे असे या लोकांचे म्हणणे आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून पालघर जिल्हातील समुद्र किनारे पर्यटकांकरिता आकर्षणाचा केंद्र ठरत आहेत.याच्या सुंदरतेमुळे पर्यटक आकर्षित होऊन पावसाळ्यात समुद्र किनारपट्टीवर मौजमजा करण्या करिता मोठ्या प्रमाणात जमा होत असतात. गेल्या काही वर्षांपासून खोल समुद्रात इंधन प्राप्त करण्यासाठी खोदकाम केले जात आहे खोदकामात योग्यप्रमानात इंधन न मिळाल्यास खोदलेली विहीर बुजविणे जिकरीचे व मोठ्या खर्चाचे असल्यामुळे तश्याच सोडल्या जात आहे त्यामधून चिकट ऑईल समुद्राच्या पृष्ठभागावर जमा होऊन किनाऱ्यावर डांबरच्या गोळ्याच्या स्वरूपात पसरत आहेत. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना त्रास होत असून चालणेही मुश्किल झाले आहे.
शिरगाव येथील स्थानिक निसर्ग प्रेमी यांनी पर्यटकांसाठी या किनाऱ्यावरील घनकचरा साफ करून एक आदर्श स्थापन केला आहे