राजेंद्र पाटील राऊत
झाडी शिव फाटयावर आढळला
देविदास,ठाकरेचा व्यक्तीचा मृतदेह
झाडी,(काकासाहेब सांळुखे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगांव तालुक्यातल्या मांंजरे ते झाडी रस्त्यावरील शिवफाटयावर झाडी ता.मालेगांव येथील देविदास कारभारी ठाकरे या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून प्राप्त झालेली माहिती अशी की,
सावकारवाडीपासून सुमारे एक दिड किलोमीटर अंतरावर सौंदाणे चोंढी रस्त्यालगत सदरचा मृतदेह बेवारस स्थितीत आढळून आला.या घटनेची खबर सावकारवाडीचे पोलिस पाटील योगेश साळुंखे व शेतमालक पुंजाराम सजन साळुंखे यांनी तालुका पोलिसांना दिल्यावर मालेगांव तालुका पोलिस स्टेशनचे कर्मचारी माळी,गायकवाड ,व थोरात यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यावर सदरचा मृतदेह झाडी येथील देविदास कारभारी ठाकरे याचा असल्याचा उलगडा झाला.याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांनी घेतली असून,पुढील तपास मालेगांव तालुका पोलिस स्टेशनचे माळी,गायकवाड ,थोरात हे करीत आहेत.