Home माझं गाव माझं गा-हाणं आता प्रतीक्षा शाळेची घंटा वाजण्याची कोरोना उतरणीला लागल्याने अपेक्षा उंचावल्या

आता प्रतीक्षा शाळेची घंटा वाजण्याची कोरोना उतरणीला लागल्याने अपेक्षा उंचावल्या

193
0

राजेंद्र पाटील राऊत

आता प्रतीक्षा शाळेची घंटा वाजण्याची

कोरोना उतरणीला लागल्याने अपेक्षा उंचावल्या
वाखारी ( प्रतिनिधी ) दादाजी हिरे /युवा मराठा न्युज नेटवर्क
वाखारीग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील कोरोनाचा प्रकोप कमी झाला असून, नवीन रुग्णसंख्येतही घट होत आहे. एप्रिल-मे महिन्यात दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येच्या तुलनेत खूपच कमी रुग्णसंख्या आढळत असल्याने प्रशासनाने जरा निर्बंधही सैल केले आहेत. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळेपासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांनाही शाळेची आस लागली असून, कोरोना उतरणीला लागल्याने शाळेच्या घंटा वाजण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

गेल्या वर्षी कोरोनामुळे बंद झालेल्या शाळा कालंतराने काही दिवस सुरूही झाल्या होत्या; परंतु पुन्हा कोरोना परत फिरल्यानेशाळा-महाविद्यालये बंद करण्यात या वर्षीही फेब्रुवारी आली. या वर्षीही महिन्यापासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले होते. मार्चमध्ये त्याचे प्रमाण दुप्पट तर एप्रिलमध्ये चार ते पाच पट वाढले होते. त्यामुळे शाळा सुरू होण्याच्या वा ऑफलाइन परीक्षा होण्याच्या आशा पूर्णता मावळल्या होत्या. कोरोनाची दुसरी लाट जरा मंदावली असून, कोरोनाचा प्रादुर्भावही कमी कमी होऊ लागल्याचे सध्या चित्रआहे. नवीन रुग्णसंख्येतील घट आणि कोरोनामुक्ती वाढता टक्का याचे सातत्य असेच राहिले तर शाळांची घंटा पुन्हा वाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनानेही जरा निर्बंध सैल केल्याने बच्चे कंपनी अर्थात सर्व वयोगटातील विद्यार्थीही शाळेसाठी आसुसले असून, त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. जून महिन्याच्या १५ तारखेपासून साधारणपणे सर्व शाळा सुरू होतात. अजूनहीकोरोनाचे सावट असल्याने त्याची तीव्रता अजून कमी झाली तर जरा उशिरानेही शाळा सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यासह पालकांनी नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू केली असून, काहींनी लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास मिळालेल्या परवानगीनंतर सुरू झालेल्या दुकानांमधून साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती.

आजपासून दुपारी चार वार्जपर्यंत सर्व प्रकारची दुकाने खुली राहणार आहेत. त्यामुळे शैक्षणिक आणि स्टेशनरी साहित्याच्या दुकानांवर पालकांसह विद्यार्थ्यांची गर्दी उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात शाळेबाबत अजून शासन स्तरावर अजून काहीच हालचाल नाही; परंतु कोरोना आटोक्यात आल्यावर विचार होईलच याची खूनगाठ बांधत बच्चे कंपनीसह पालकवर्गही तयारीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here