Anshuraj patil
देवळा पोलिसांचे आर्थिक दुर्लक्ष?
वासोळच्या ज्ञानेश्वरची बुध्दी खोटी,
कोलती नदीच्या काठी;सट्टा मटक्याची पेढी चालवतो गरीबांना लुटण्यासाठी!!
देवळा,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज)-नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात असलेल्या वासोळ गावाच्या शिवारातील कोलती नदीच्या काठावर ज्ञानेश्वर अहिरे नामक व्यक्ती खुलेआम सट्टा मटका चालवुन गोरगरिबांना लुटण्याचा उद्योग करीत असून,याकडे मात्र पोलिस प्रशासनाचे आर्थिक दुर्लक्ष आहे की,काय?असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वासोळ गावाकडून लोहणेरकडे जात असताना रस्त्यावर कोलती नदी लागते आणि या कोलती नदीच्या काठावरच काटेरी झाडाझुडपात ज्ञानेश्वरचे हे अवैध व बेकायदेशीर उद्योग बिनधास्तपणे सुरु आहेत.सट्टा मटका म्हणजे हा असा खेळ आहे की,गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य नागरिक एकदा का या जुगाराच्या खेळात नादी लागला की,त्याच्या संसाराची पुर्णता राखरांगोळी झालीच म्हणून समजा…माय माऊलीचा तळतळाट व संसार उध्वस्त करण्याचे महापाप ज्ञानेश्वर अहिरे या जुगाराच्या माध्यमातून करीत आहे.तरीही त्याच्या या अवैध गैरउद्योगाकडे देवळा पोलिसांचे दुर्लक्ष का?याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान मध्यंतरी नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक डाँ.प्रतापराव दिघावकर यांच्या कठोर व कडक कारवाईमुळे हे अवैध उद्योग बंद झाले होते.मात्र डाँ.दिघावकर यांच्या सेवानिवृतीनंतर पुन्हा ज्ञानेश्वरच्या “जुगारी” ज्ञानेश्वरी गाथेचे पारायण सुरु झाले आहे.याला नेमका आशिर्वाद कुणाचा?असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.एका बाजुला जुगाराचा अड्डा खुलेआम चालवून दुसऱ्या बाजुला समाजसेवकाचा बुरखा पांघरुन समाजकार्यात पुढाकार घेणाऱ्या ज्ञानेश्वर अहिरेला कोणत्या पोलिसांचे पाठबळ मिळत आहे की,त्या सट्टाकिंग ज्ञानेश्वर अहिरेची एवढी हिंमत बळावली.नाशिक जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील व देवळा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांनी बेधडक व कठोर कारवाई करुन हा अवैध जुगाराचा अड्डा तात्काळ बंद करुन ज्ञानेश्वर अहिरेचे बेकायदेशीर साम्राज्य उध्वस्त करावे अशी मागणी वासोळ परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.