राजेंद्र पाटील राऊत
राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस संदीप अहिरे यांच्याकडुन वरचे टेंभे गावात १००० मास्क चे वाटप
सटाणा,(जगदिश बधान तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
टेंभे (वरचे)
कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस संदिप आहिरे यांच्याकडुन टेंभे वरचे गावात एक हजार मास्कचे मोफत वाटप करण्यात आले…
ग्रामिण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भात रोखण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अँड.रविंद्रनाना पगार व बागलाणचे माजी आमदार श्री.संजयनाना चव्हाणसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस समाजसेवक संदिप आहिरे यांच्याकडून टेंभे वरचे गावात एक हजार मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी मास्क का घालावा व कसा घालावा याचेही महत्वही पटवुन देण्यात आले.
गेल्या वर्षीही समाजसेवक संदिप आहिरे यांनी टेंभे गावात मास्क व सँनिटायजरचे वाटप केले होते,
यावेळी सरपंच किशोर खरे, उपसरपंच मालोजी आहिरे, ग्रामपंचायत सदस्य प्रमिला मोरे,तसेच विष्णु आहिरे,रुपाली खरे, दिपक आहिरे,भुषण वाघ,वसंत वाघ,रामराव वाघ, कैलास वाघ,त्र्यंबक वाघ,सुकदेव आहिरे,विजय आहिरे,दादाजी आहिरे,अमोल वाघ,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.