Home माझं गाव माझं गा-हाणं बागलाण तालुक्यातील सर्व आजी माजी लोकप्रतिनीधी व अधिकारी तसेच कोव्हिडं आपत्ती व्यवस्थापन...

बागलाण तालुक्यातील सर्व आजी माजी लोकप्रतिनीधी व अधिकारी तसेच कोव्हिडं आपत्ती व्यवस्थापन मध्ये काम करणाऱ्या सर्व घटकांना नम्र विनंती…

209
0

राजेंद्र पाटील राऊत

बागलाण तालुक्यातील सर्व आजी माजी लोकप्रतिनीधी व अधिकारी तसेच कोव्हिडं आपत्ती व्यवस्थापन मध्ये काम करणाऱ्या सर्व घटकांना नम्र विनंती…                                               सटाणा,(जगदिश बधान तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
आपला बागलाण तालुका क्षेत्रफळाच्या व लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा आहे तालुक्यात 171 गावे असुन कोरोना चा खूपच प्रादुर्भाव खेडो पाडी वाढला आहे त्या तुलनेने खाजगी रुग्णालये फारच कमी आहेत तर सरकारी ग्रामीण रुग्णालय ही मोजकेच आहेत सध्या बागलाण तालुक्यातील एकमेव असलेल्या डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयात (dchc ) सेंटर सुरू आहे या ऑक्सिजन सुविधा असलेल्या रुग्णालयात सध्या रुगणांची रीघ लागली आहे असंख्य रुग्ण वेटिंग ला आहे परिस्थिती हाताबाहेर जात असताना बाहेर बेड नाही तर तालुक्यातील बहुतांश भाग हा आदिवाशी भाग आहे मोठ्या दवाखान्यात बेड नाही तर काहींना पैसा अभावी उपचार घेता येत नाही सर्व काही कठीण आहे मात्र गेली अनेक दिवसापूर्वी सटाणा नामपूर dchc सेंटर सुरू करणे गरजेचे होते मात्र तस झालेले दिसत नाही संपूर्ण तालुक्याचा रूग्ण संख्येचा भार हा डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयावर येत असून येथील यंत्रणा ही आता हतबल झाली आहे अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांकडून वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना येणाऱ्या फोन कॉल्स तसेच स्थानिक पत्रकार लोकप्रतिनिधी यांना येणारे फोन या सर्व गोष्टींमुळे नेमका बेड कसा उपलबध करावा या विवनचनेतच आरोग्य कर्मचारी राहत आहेत इतक्या मोठ्या तालुक्याला 30 बेड चे रुग्णालय म्हणजे फार लहान होत आहे माझी सर्व घटकांना विनंती राहील कुठल्याही परिस्थिती मध्ये नामपूर आणि सटाणा येथे तात्काळ कोव्हिडं सेंटर सुरू करा अन्यथा तालुक्यातील आपलेच अनेक बांधव वेळेवर उपचार न मिळाल्याने आपल्याला सोडून जातील अशी वेळ कोणावर ही येऊ नये म्हणून प्रशासण व लोकप्रतिनिधी मिळून तात्काळ dchc सेंटर अन्य ठिकाणी ही सुरु करा हीच विनंती ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here