Home गुन्हेगारी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा

तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा

130
0

राजेंद्र पाटील राऊत

तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

जम्मू काश्मिरमधील शोपिया सेक्टरमधील हाडीपोरा येथे दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराने मोठी कारवाई केली. शनिवारी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. दुपारी सुरू झालेल्या धुमश्चक्रीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. मागील ४८ तासांत लष्कराने हाती घेतलेल्या मोहिमेत १० दहशतवादी ठा र झाले.
दहशतवादी संघटनेत नव्यानं दाखल झालेल्या तरुणाचं मतपरिवर्तन करून शरण येण्याचं आवाहन जवानांकडून करण्यात आलं. त्याचबरोबर तरुणाच्या वडिलांनीही त्याला शरण येण्यासाठी विनवणी केली. मात्र, त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला शरण येण्यापासून रोखलं, असं काश्मीर पोलिसांनी म्हटलं आहे.

▪️ ठार झालेले तिन्ही दहशतवादी अल बद्री संघटनेशी संबंधित होते अशी माहिती पोलिसांनी दिली. या चकमकीनंतर सुरक्षा जवानांची परिसरात शोधमोहीम सुरूच आहे.

📍 लष्करांकडून सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेत गेल्या ४८ तासांत १० दहशतवादी ठार झाले आहेत. पुलवामात केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले होते. तर दक्षिण काश्मिरमध्ये तब्बल चार ठिकाणी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी उडाल्या आहेत.

Previous articleहिप्परगा (माळ) ता.बिलोली येथे कोरोना covid-19 प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर संपन्न…
Next articleधडकी भरवणारी आकडेवारी! देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here