Home माझं गाव माझं गा-हाणं बाप भीक मागू देत नाही आणि आई पोटभर जेवण देत नाही अशी...

बाप भीक मागू देत नाही आणि आई पोटभर जेवण देत नाही अशी अवस्था महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य व शेतकरी वर्गाची झालेली आहे

105
0

Anshuraj patil

बाप भीक मागू देत नाही आणि
आई पोटभर जेवण देत नाही अशी अवस्था महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य व शेतकरी वर्गाची झालेली आहे

3 दिवसापासून तळवाडे गावाची दिवा बत्ती गुल ?

युवा मराठा मालेगाव विभागीय संपादक निंबा भाऊ जाधव

19/3/2021 तारखेपासून गाव अंधारात
तळवाडे ता मालेगाव जि नाशिक

गावाला पाणीपुरवठा विज बिल थकीत आहे अशी माहिती मिळत आहे
पियोजल अंतर्गत झालेले वॉटर लेंडी शिवार सप्लाय पंपाचे ते कनेक्शन सुद्धा लवकरच कट करण्यात येईल
असे महावितरण कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे

शेतकऱ्यांची व्यथा
शेतीमालाला पाहिजे तो योग्य भाव मिळत नाही
कोरोना अतिवृष्टी तसेच उन्हाळ्याच्या पृष्ठभूमीवर वीज तोडण्यामुळे शेतीतील पिके जळून चालली आहेत शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे शेतकऱ्यांचा सहनशीलतेचा अंत न पाहता शासनाने शेती पंपाच्या वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी चर्चा सर्वसामान्य शेतकरी वर्गात होत आहे
तळवाडे शिवारात शेतकरी बांधवाच्या डीप्याच बंन्द करण्यात आल्या
शेतकरी किती विनवण्या करत आहेत अर्धातास तरी चालू करून द्या आमच्या घरी माणसांना व गाईगुरांना प्यायला पाणी नाही
शेतकऱ्यांच्या मागणीकडे सरासर दुर्लक्ष झालेल दिसत आहे
कृषी पंपाचे काहीतरी वीज बिल भरा तरच डीपी चालू करण्यात येईल
आम्हाला वरून तसे आदेश आहे
असे महावितरण कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे
?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here