Home विदर्भ आदिम कोलामांच्या ढोलांचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचेल का ? स्वातंत्र्याच्या इतिहासात माणिकगडवरील...

आदिम कोलामांच्या ढोलांचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचेल का ? स्वातंत्र्याच्या इतिहासात माणिकगडवरील कोलामांचे पहिलेवहिले ‘ढोल सत्याग्रह’

147
0

राजेंद्र पाटील राऊत

आदिम कोलामांच्या ढोलांचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचेल का ?
स्वातंत्र्याच्या इतिहासात माणिकगडवरील कोलामांचे पहिलेवहिले ‘ढोल सत्याग्रह’
राजुरा, ता.१६ : माणिकगड पहाडावर गर्द जंगलात आणि जंगली श्वापदाच्या सानिध्यात अनेक पिढ्यांपासून वास्तव्य करून गुजरान करणा-या कोलामांना आपल्या वास्तव्याचे प्रमाण मागीतले जात आहे. सरकार त्यांच्या योजना अडवून बसले आहे. शासकीय यंत्रणेने जंगलात जाऊन त्यांची वेळीच नोंद घेतली असती तर आज पुरावा मागण्याची वेळच आली नसती. आदिम कोलामांच्या शोषणाला शासनव्यवस्थाच जबाबदार असून, त्यांच्या गुड्यावरील दुरावस्थेचा हिशोब मांडण्यासाठी आज ( ता. 15) राजुरा येथे आदिम समुदायाने ढोल सत्याग्रह केले. कोलामांचे पारंपारीक वाद्य असलेल्या ढोलांचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचून कोलामांना न्याय मिळेल का ? असा सवाल कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांनी उपस्थीत केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यासह कोरपना व राजुरा येथील आदिम कोलाम समुदायाचे ढोल सत्याग्रह आंदोलन कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांचे नेत्रुत्वात करण्यात आले. राजुरा येथील भवानी मातेचे पुजन करून हजारो कोलाम ढोल वाजवित उपविभागीय कार्यालयावर धडकले. ढोलाच्या तालावर थीरकणारे पावले अन् आपल्या परंपरेला साजेसे लाल-पांढरे झेंडे, पुजेचे सामान असलेले वडगे घेतलेला कोलामांचा जत्था पाहतांना राजुरा वासिय दंग झाले. आदिम कोलामांना संपुर्ण संरक्षण मिळावे, विनाअट वनजमीनीचे पट्टे देण्यात यावे, कोलामगुड्यावर तातडीने मुलभूत सोयी सुविधा बहाल करण्यात याव्यात, गेल्या दहा वर्षात बांधण्यात आलेल्या घरकुल व शौचालय बांधकामाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी यासह खावटी अनुदान, उत्तम शिक्षण व आरोग्य अशा अनेक मागण्यांचे निवेदन शासनाला पाठविण्यात आले. उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी कोलामांचा लढा सरकारच्या डोळ्यात झनझणीत अंजन घालणारे असून, स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही हा समाज विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडल्या गेलेला नाही यातच शासन प्रशासनाचा पराभव आहे. सरकारने जागे होऊन कोलामांना तातडीने न्याय मिळवून द्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष पुजू कोडापे, सचीव मारोती सिडाम, नानाजी मडावी, वाघूजी गेडाम वअन्य सहका-यांनी मार्गदर्शन केले.(युवा मराठा न्युज नेटवर्क)

Previous articleपाळे बु सरपंचपदी नंदू भाऊ गोविंद निकम बिनविरोध
Next articleवनमंत्री संजय राठोड यांचा अखेर राजीनामा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here