Home नांदेड अवैध रेतीसाठा जागीच जप्त करून जागा मालकांविरुध्द गुन्हे दाखल कण्याचा दिला जिल्हादंडाधिकारी...

अवैध रेतीसाठा जागीच जप्त करून जागा मालकांविरुध्द गुन्हे दाखल कण्याचा दिला जिल्हादंडाधिकारी डॉ. इटनकर यांनी इशारा .

140
0

राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक

अवैध रेतीसाठा जागीच जप्त करून जागा मालकांविरुध्द गुन्हे दाखल कण्याचा दिला जिल्हादंडाधिकारी डॉ. इटनकर यांनी इशारा

नांदेड,दि.१ – राजेश एन भांगे

जिल्ह्यातील गोदावरी पात्र व इतर नदी क्षेत्रातील अवैधरित्या होणाऱ्या रेती उत्खननाला आळा बसण्यासाठी जिल्हा प्रशासना तर्फे तराफे उध्वस्त करण्यासमवेत रेतीचे वाहने जप्त केली जात आहेत. अवैध रेती उत्खननाला आळा बसावा यासाठी आता आम्ही अधिक कठोर पावले उचलत असून नांदेड महानगर पालिका, जिल्ह्यातील नगर परिषदा व ग्राम पंचायतीच्या हद्दीत जिथे कुठे मोठ्या प्रमाणावर वाळूसाठा उपलब्ध असेल तर तो जिल्हा प्रशासना तर्फे जागच्या जागीच जप्त करुन ज्याच्या मालकीची ती जागा / प्लॉट आहे त्या प्लॉट धारका विरुध्द गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज दिला.

त्यांच्या अध्यक्षतेखाली आज अवैध रेती उत्खनाना बद्दल जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापक बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, तहसिलदार किरण अंबेकर उपस्थित होते. सर्व विभागाचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सहभाग घेतला.

रेतीचे गगनाला भिडलेले भाव लक्षात घेता ज्या नागरिकांनी बांधकासाठी रेती घेवून ठेवलेली आहे. त्यांनी रेतीच्या पावत्या तपासणी पथकाला दाखवाव्यात. रेतीच्या पावत्या देणे हे कायद्याने बंधनकारक असून अवैध रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी महसुलच्या पथकांना जनतेने सहकार्य करावे असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here