भऊर येथे बिबट्याने केल्या पाच शेळ्या फस्त ; पिंजरा लावण्याची मागणी
(भिला आहेर तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा:- भऊर ता . देवळा येथे बुधवारी( दि ७ ) रोजी रात्रीच्या सुमारास बिबट्याने ५ शेळ्या फस्त केल्याने पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे .वन विभागाने याठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे . याबाबत अधिक माहिती अशी की , भऊर ता देवळा येथील रामनगर शिवारातील प्रगतिशील शेतकरी प्रकाश शिवाजी पवार यांनी आपल्या घराजवलिळ शेडमध्ये शेळ्या बांधल्या होत्या . बुधवारी दि ७ रोजी पवार हे पहाटे लघुशंकेसाठी बाहेर आले तेव्हा त्यांना यातील एक बोकड शेडबाहेर दिसून आल्यानंतर शेड मधील पाच शेळ्या बिबट्याने फस्त केल्याचे दिसून आले . या घटनेची माहिती आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पवार यांना धीर दिला . यावेळी वनरक्षक शांताराम आहेर, वनपाल राकेश आहेर, गवळी , तलाठी नितीन धोंडगे ,कोतवाल जीभाऊ गरुड, पशुवैद्यकीय अधिकारी पाटील यांनी भेट देऊन घटनास्थळी पंचनामा केला . यावेळी सरपंच दादा मोरे, पोलीस पाटील भरत पवार, देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जगदीश पवार, पंडित पवार, शैलेश पवार, विजय पवार, दीपक पवार, शशी पवार, नितीन पवार, राजेंद्र पवार , जितेंद्र पवार आदी उपस्थित होते . पशुपालकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ,बिबट्या चा बंदोबस्त करण्यासाठी याठिकाणी पिंजरा बसविण्यात यावा ,अशी मागणी केली . प्रकाश पवार यांच्या पाच शेळ्या बिबट्याने फस्त केल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले असून , भरपाई मिळावी अशी मागणी पवार यांनी केली आहे .