शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर करावा
डॉ. राहुल रनाळकर: शिक्षक ध्येय डॉट कॉम या संकेतस्थळाचे लोकार्पण
नाशिक,(विष्णू अहिरे विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क:- लॉकडाउन काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देतांना विविध तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे प्रतिपादन ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी केले.
राज्यातील शिक्षकांनी सुरु केलेले ‘शिक्षक ध्येय’ साप्ताहिकाच्या संकेतस्थळाचे उदघाटन श्री. रनाळकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, राज्यातील शिक्षक एकत्र येत शिक्षकांसाठी सुरु केलेले ‘शिक्षक ध्येय’ साप्ताहिक व संकेतस्थळ एक मुक्त व्यासपीठ ठरावे. शिक्षणातील तंत्रज्ञानासंबंधी माहिती, शिक्षकांनी राबविलेले विविध उपक्रम, त्यांचे अनुभव आदि एकाच छताखाली मिळविण्यासाठी हे संकेतस्थळ उपयुक्त आहे. “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय” समोर ठेवून शिक्षकांनी शिक्षकांसाठी सुरु केलेले ‘शिक्षक ध्येय’ साप्ताहिक व संकेतस्थळाच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध शैक्षणिक नवसंकल्पना, उपक्रम याद्वारे अनेक शिक्षकांपर्यंत पोचवून, त्यांचे अनुकरण करीत इतर शाळेत शैक्षणिक सुधारणा होण्यास मदत होईल.
राज्यात ‘शिक्षक ध्येय’चे ८१ व्हाट्सएप ग्रुप असून जिल्हा व तालुकास्तरावर ९० प्रतिनिधी कार्यरत आहेत. संपादकीय मंडळात कार्यकारी संपादक: प्रभाकर कोळसे, वर्धा; अतिथी संपादक किशोर पाटील कुंझरकर, जळगाव; प्रशांत म्हस्के, अहमदनगर; मिलिंद पगारे, नाशिक; सुधाकर जाधव, औरंगाबाद; सहायक संपादक अशरफ आंजर्लेकर, रत्नागिरी; निलेशकुमार इंगोले, अमरावती; डॉ. माधव गावीत, औरंगाबाद; महादेव खळुरे, लातूर; रमेश खरबस, अकोले (अहमदनगर); सहसंपादक डॉ. अमोल बागूल, अहमदनगर; नितीन केवटे, नाशिक; विशाल टिप्रमवार, औरंगाबाद; दिलीप वाघमारे, सांगली; कविता चौधरी, जळगाव; दीपाली बाभुळकर, अमरावती; मुद्रितशोधन डॉ. मनीषा पवार-पाटील, जळगाव; राजश्री कोष्टी, नाशिक; जाहिरात व्यवस्थापक:
प्रशांत पेंधे, ठाणे; प्रतिनिधी डॉ. सुधीर अग्रवाल, नागपूर; वैभव चेके, बुलडाणा; विनोदकुमार माने, गोंदिया; सतेशकुमार माळवे, सातारा; अरुणा उदावंत, जळगाव; प्रणाली कोल्हे, वर्धा; विष्णू ढेबे, सातारा; प्रेमजीत गतीगंते, मुंबई; परेश पडोळकर, बुलडाणा; अजय भालेराव, अहमदनगर; अजय काळे, सांगली; सलिम आतार, औरंगाबाद; पाकिजा पटेल, पारोळा; जबीन इस्माईल सय्यद, पुणे; दत्तात्रय भालके, बीड; सुनिल उगले, कल्याण; तारीश अत्तार, सांगली; प्रकाश पांढरे, रत्नागिरी; संजय पवार, रायगड; रंजना कोळी-इंगळे, जामनेर, जळगाव; मंजुषा खत्री, नाशिक; पद्माकर मोरे, उस्मानाबाद; श्रध्दा पवार, पाचोरा; लता पांढरे, रत्नागिरी; पद्माकर मोरे, उस्मानाबाद आदी शिक्षकांचा संपादकीय मंडळात समावेश आहे.
उदघाटनप्रसंगी नाशिकच्या ‘सकाळ’ कार्यालयात ‘शिक्षक ध्येय’चे संपादक मधुकर घायदार, ‘सकाळ’चे वितरण व्यवस्थापक राजेंद्र महाजन, जाहिरात व्यवस्थापक सुनिल पाटील, एच आर व्यवस्थापक संजय पाटील उपस्थित आदि उपस्थित होते.