Home Breaking News राजगृहावरील हल्लेखोरांना त्वरित अटक करण्याची ; देगलूरआंबेडकरी अनुयायांची मागणी – नांदेड,...

राजगृहावरील हल्लेखोरांना त्वरित अटक करण्याची ; देगलूरआंबेडकरी अनुयायांची मागणी – नांदेड, दि. ८ ; राजेश एन भांगे

118
0

राजगृहावरील हल्लेखोरांना त्वरित अटक करण्याची ; देगलूरआंबेडकरी अनुयायांची मागणी –
नांदेड, दि. ८ ; राजेश एन भांगे

मुबंई येथील राजगृहावर अज्ञात मतेफिरुनी हल्ला करून राजगृहावरील CCTV कॅमेरा , झाडांची कुंडीसह इतर अनेक वस्तूंची नासधूस केल्या प्रकरणी संबंधित मतेफिरुना तात्काळ अटक करणे संबंधीचे निवेदन देण्यात आले.
मुंबई येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थान व तमाम जगातील आंबेडकरी अनुयायांनचे प्रेरणास्थान व ऐतिहासिक स्थळ असलेल्या या वस्तुवर काल संध्याकाळी अज्ञात मातेफेरुनी हल्ला करून CCTV कॅमेरा व झाडांच्या कुंडीसह इतर अनेक नासधूस केली आहे . त्यामुळे याप्रकरणाने संपूर्ण आंबेडकरी अनुयायांनमध्ये संतापाची लाट उसळली असून या हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कडक कार्यवाही करून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निवेदन मा उपजिल्हाधिकारी देगलूर मार्फत मा .मुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देगलूर येथील सर्व आंबेडकरी अनुयायांच्या वतीने देणात आले या प्रसंगी देगलूर नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, प्रा उत्तमकुमार कांबळे, सुभाष अल्लापुरकर , ऍड अविनाश सुयवांशी ,सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे , विकास नरबागे ,संजय कांबळे, मिलिंद बिरकांगण,शेख शाबीर,कैलास येसगे, मिलिंद कावळगावकर, मोहन भालेराव, किर्तीराज सोनकांबळे,मदने रत्नदीप,धोंडिबा गायकवाड, सुशांत धनवे, मनोज सोनकांबळे, संजय सोमे, गजू कांबळे ,विशाल बोरगावकर, प्रवीण सर्यवंशी आदी समाज बांधव उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here