Home Breaking News नांदेड जिल्ह्यात गत २४ तासात सरासरी २३.५३ मि.मी. पाऊसाची नोंद*

नांदेड जिल्ह्यात गत २४ तासात सरासरी २३.५३ मि.मी. पाऊसाची नोंद*

412
0

*नांदेड जिल्ह्यात गत २४ तासात सरासरी २३.५३ मि.मी. पाऊसाची नोंद*
*नांदेड, दि. १२ : राजेश एन भांगे*
जिल्ह्यात शुक्रवार 12 जून 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 23.53 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 376.51 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 71.44 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 8.02 टक्के एवढा पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात 12 जून 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 16.38 (102.27), मुदखेड- 18.67 (61.01), अर्धापूर- 5.33 (50.33), भोकर- 31.50 (94.00), उमरी- 32.00 (57.00), कंधार- 20.67 (59.84), लोहा- 13.67 (62.83), किनवट- 8.86 (38.14), माहूर- 19.00 (58.00), हदगाव- 5.29 (69.57), हिमायतनगर- 30.00 (101.67), देगलूर- 29.00 (94.26), बिलोली- 33.80 (54.80), धर्माबाद- 38.00 (79.99), नायगाव- 39.20 (63.20), मुखेड- 35.14 (96.13). आज अखेर पावसाची सरासरी 71.44 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 1143.04) मिलीमीटर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here