Home नांदेड धक्कादायक” नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे द्विशतक पार तर एकाच दिवसात २ मृत्यू, दिवसभरात...

धक्कादायक” नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे द्विशतक पार तर एकाच दिवसात २ मृत्यू, दिवसभरात १० पॉसिटीव्ह रुग्णांची भर*

102
0

*धक्कादायक” नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे द्विशतक पार तर एकाच दिवसात २ मृत्यू, दिवसभरात १० पॉसिटीव्ह रुग्णांची भर*
*नांदेड, दि १० ; राजेश एन भांगे*
जिल्ह्यातील बुधवार दिनांक 10 जून 2020 रोजी प्राप्त झालेले एकूण साठा वाला पैकी 49 अहवाल प्राप्त झाले व नवीन दहा रुग्णांचे पॉझिटिव आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 203 एवढी झाली आहे.

आज दिनांक 10 जून 2020 रोजी पंजाब भवन यात्री निवास नांदेड येथील 3 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे त्यामुळे सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता 137 एवढी झाली.

व तसेच आज दिवसभरात दोन पॉझिटिव रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, सदरील दोन रुग्ण हे पुरुष असून इतवारा भागातील मृत्यू पावलेल्या रुग्णांचे वय वर्ष 65 व ता.वसमत जिल्हा हिंगोली येथील रूग्णाचे वय 45 आहे. हे दोन्ही रुग्ण डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचार घेत होते. या दोन्ही रुग्णास श्वसनाचा त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार होते.

व तसेच आज सायंकाळी पाच वाजता प्राप्त झालेल्या 10 पॉसिटीव्ह रुग्णांपैकी आठ पुरुष रुग्ण आहे..त्यांचे वय वर्ष अनुक्रमे 12, 43, 45, 47, 48, 54, 55 असून यात एका 6 महिन्याच्या बालकाचा देखील समावेश आहे. यात 5 रुग्ण हे शहरातील इतवारा बाधित क्षेत्रातील आहेत. व इतर 1 रुग्ण मालेगाव रोड आणि 2 रुग्ण हे सिडको नांदेड या परिसरातील 2 स्त्री रुग्ण वय वर्ष अनुक्रमे 50 व 10 असून या रुग्णांपैकी 1 रुग्ण शहरातील चौफळा परिसर व इतवारा नांदेड येथील आहे. यातील 9 रुग्णांची प्रकृती सध्यास्थितीत स्थिर आहे.

आतापर्यंत 203 रुग्णांपैकी 137 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, 11 रुग्णांनी उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे, तर नांदेड आरोग्य विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्या नुसार उर्वरित 55 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील 3 रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे, या मध्ये 1 स्त्री रुग्ण आहे, जिचे वय वर्ष 65 आणि 2 पुरुष रुग्ण ज्यांचे वय वर्ष 38 व 74 आहे. तर एका रुग्णास उपचारासाठी औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आले आहे. बुधवार

बुधवार दिनांक 10 जून रोजी आणखी 69 स्वॉब तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत, त्यांच्या अहवाल उद्या संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील असे नांदेड आरोग्य विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेले आहे.

✔️नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात 10 पॉझिटिव रुग्णांची भर.

☑️ एकूण रुग्ण संख्या 203 वर.

☑️दिवसभरात 3 रुग्णांना सुट्टी.

☑️ आत्तापर्यंत 137 बरे होऊन घरी.

☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.

☑️आता पर्यंत 11 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.

☑️55 रुग्णांवर उपचार सुरू.

☑️ 1 महिला 2 पुरुष रुग्णाची प्रकृती चिंताजनक.

☑️ एक रुग्ण उपचारास्तव औरंगाबाद येथे संदर्भित.

दरम्यान जनतेने घाबरुन न जाता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहून नागरिकांनी दक्षाता घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Previous articleबॉलिवूड अभिनेत्याला मातृशोक.
Next articleसुरगाणा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव. 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here