Home Breaking News जिल्ह्यातील पहिल्या कोरोना विषाणू चाचणी(covid-19) स्वॅब तपासणी (व्हि. आर. डी. एल.) प्रयोगशाळेचे...

जिल्ह्यातील पहिल्या कोरोना विषाणू चाचणी(covid-19) स्वॅब तपासणी (व्हि. आर. डी. एल.) प्रयोगशाळेचे उद्घाटन पालकमंत्री मा. धनंजय मुंडें हस्ते*

139
0

*जिल्ह्यातील पहिल्या कोरोना विषाणू चाचणी(covid-19) स्वॅब तपासणी (व्हि. आर. डी. एल.) प्रयोगशाळेचे उद्घाटन पालकमंत्री मा. धनंजय मुंडें हस्ते*
*विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे*
बीड, दि. ८ : – बीडसह इतर जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांच्या विषाणूंचे नमुने तपासण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना व केंद्र सरकारच्या मार्गदर्शक निर्देशानुसार आवश्यक त्या रुग्णांच्या तात्काळ चाचणी करण्यासाठी या प्रयोगशाळेचा महत्त्वाचा उपयोग होईल यापूर्वी यासाठी औरंगाबाद , पुणे नंतर लातूर ठिकाणी नमुने पाठवून अहवाल येण्यास 24 तास लागायचे त्या वेळेची बचत होईल असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

अंबाजोगाई येथे कोरोना विषाणू चाचणी (covid-19) साठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सूक्ष्म जीवशास्त्र विभागाअंतर्गत विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (व्हि. आर. डी. एल.)आज पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमास आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी राहुल रेखावार , महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर बी पवार, उपस्थित होते. कोरोना विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रम साधेपणाने करण्यात आला.

पालक मंत्री श्री मुंडे म्हणाले कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाल्यानंतर पुणे-मुंबई सह इतर प्रादुर्भाव झालेल्या जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात येथील मूळचे चाकरमाने परत येऊ लागले. जिल्ह्यात बाधित रुग्ण आढळून येऊ लागले. आज उद्घाटन केलेल्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील देखील कोरोना संशयित रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करता येईल व कोरोना संसर्ग साथीला नियंत्रणात ठेवण्यासाठी याची मदत होईल असे पालकमंत्री श्री मुंडे म्हणाले

ते पुढे म्हणाले, या प्रयोगशाळेच्या कार्यान्वित होण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान संस्था कडे पाठपुरावा करण्यात आला असून जिल्हाधिकारी, डीन स्वाराती आणि प्रशासन यांचे प्रयत्न महत्त्वाचे आहे असे पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रयोगशाळेची केली पाहणी

यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ( व्हि. आर. डी. एल. ) प्रयोगशाळेची पाहणी केली. अधिष्ठाता डॉ. देशमुख तसेच डॉ. निळेकर, डॉ. अमित लोमटे यांनी माहिती दिली. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात मागील महिन्यात भेट देऊन आढावा घेतला होता. यानंतर एमआरआय मशीन प्रश्न मार्गी लावून व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले आहेत. आज उद्घाटन झालेल्या व्हि. आर. डी. एल. प्रयोग शाळेमुळे कोरोना विरुद्धच्या लढाईत जिल्ह्यात बळ प्राप्त झाले आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बीड जिल्ह्यातच कोरोना स्वॅब ची तपासणी केली जावी, या अनुषंगाने पालकमंत्री श्री. मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्याने राज्य शासनाच्या मान्यतेसह स्वाराती रुग्णालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळेस भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) यांची चाचणी सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. सुरुवातीला दर दिवसाला येथे कोरोना विषाणू संबंधीच्या स्वॅबच्या १०० नमुन्यांची तपासणी करणे शक्य होणार असून हळूहळू ही संख्या वाढवली जाईल.

Previous articleआजपासून देशात अनलँक होत आहे
Next articleमहाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७१ च्या नियम ११ मध्ये सुधारणा करण्यासाठी अधिसूचना ; जिल्हाधिकारी नांदेड*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here