• Home
  • संपादकीय अग्रलेख

संपादकीय अग्रलेख

🛑 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जन्मदिना निमित्त विनम्र अभिवादन 🛑
⭕( युवा मराठा न्युज )⭕

अहमदनगर :⭕चोंडी ता. जामखेड .
हे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान आहे. याच गावात 31 मे 1725 रोजी अहिल्यादेवींचा जन्म झाला . पुढे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडोजीराव होळकरांशी त्यांचा विवाह झाला. अहिल्यादेवी बालपणापासूनच शुर, चाणाक्ष, तल्लख व कुशाग्र बुद्धीच्या होत्या. पुढे 1754 मध्ये खंडोजीराव होळकर कुंभेर या ठिकाणी झालेल्या लढाईत मारले गेले.सासरे मल्हारराव अहिल्याला म्हणाले, “माझा खंडू गेला म्हणून काय झालं? तुझ्या रूपानं माझा खंडू अजून जिवंत आहे. तू सती जाऊ नकोस.” अहिल्यादेवींनी ते ऐकलं.अहिल्यादेवींच्या हाती सत्तेची सुत्रे दिली गेली. त्यांनी अनेक ठिकाणी शत्रुला धुळ चारून लढाया जिंकल्या. अहिल्यादेवी या उत्तम तिरंदाज होत्या. त्या उत्तम न्यायाधिश, उत्तम प्रशासक होत्या. त्यांनी महिलांची फौज निर्माण केली होती .उत्तर भारतात माहेश्वरी येथे 27 वर्षे त्यांनी राज्य केलं.
चोंडी या ठिकाणी आजही त्यांचा राहता वाडा आहे. वाड्यामध्ये अहिल्यादेवींच्या गौरवशाली इतिहासातील अनेक प्रसंगांची शिल्पे बनवण्यात आलेली आहेत. वाड्याबाहेर त्यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा व स्मृती स्तंभ उभारण्यात आलेला आहे.
एका छोट्याशा गावात सामान्य कुटूंबात जन्माला आलेली मुलगी आपल्या शौर्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर उत्तर भारतात राज्यकर्ती बनू शकते. आजच्या युवकांनी अशा महापुरुषांच्या संघर्षमय जीवनकार्याचा आदर्श घेतल्यास आजचा तरुण परिस्थितीवर रडत बसणार नाही, तर तो परिस्थितीशी धैर्याने लढेन आणि निश्चितच प्रगती करू शकेन. अहिल्याबाई होळकर यांच्या राज्य बरखास्तीचा डाव राघोबा पेशवे यांनी आखला होता.तो चाणाक्षपणे अहिल्याबाई होळकर यांनी ऊधळून लावला.
महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा वारसा घेऊन
आदर्श राज्यकारभार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी असेच होते. त्यांच्या प्रत्येक कामात दूरदृष्टी दिसून येत .व्यक्तिगत जीवनात अहिल्याबाईंनी अनेक संकटांना तोंड देत सुमारे 27वर्ष राज्यकारभार केला. पण या सगळ्या कारभारात अहिल्यादेवींनी स्वतःची अशी अर्थनीती व जलनीती ठरवली .महिला असूनही राजसत्तेचे नेतृत्व कसे असावे याचे उत्तम उदाहरण अहिल्याबाईंनी घालून दिले. राज्यातील शेतकरी कष्टकरी उपेक्षित वर्ग हा त्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू होता .शिवाय कसण्यास दिलेल्या जमिनीत शेतकऱ्यांनी वीस फळझाडे लावावीत त्यातील 11 झाडे सरकारची आणि नऊ झाडे शेतकऱ्यांची असे सूत्र ठरवले होते. अहिल्यादेवींच्या जलनीती मध्येही अर्थनीती प्रमाणेच सर्वसमावेशकता होती. त्याकाळी फड पद्धतीने पाणी वाटपावर अहिल्यादेवींनी भरपूर पैसे खर्च केले. ज्यादा पैसे खर्च करून पाणी दिल्याने उत्पन्न वाढीचा वायदा त्यांनी शेतकऱ्यांशी केला पण शेतकऱ्यांकडून उत्पन्ना एवढाच सारा वसूल केला .शेतीच्या पाण्याचे महत्त्व त्यांनी जाणले होते, पण पिण्याच्या पाण्यासाठीही पुढे अनेक भागात विहिरी बारव ,आड ,घाट यासारख्या योजना त्यांनी त्यांच्या कल्पनेतून उभारल्या त्यापैकी बहुतांश विहिरी आजही सुस्थितीत आहेत.ग्राम व्यवस्थेची घडी त्यानी चांगली बसवली होती.गावोगावी न्याय देणारे पंचाधिकारी नेमले होते.राज्यकारभार करताना जुन्या रूढी-परंपरांना त्यांनी कायमच विरोध केला.पुरूषप्रधान व्यवस्थेत स्वच्छ आणि शिस्तबध्द कारभार करणार्या त्या रणरागिनी होत्या ,प्रचंड आत्मविश्वास, धाडस ,दूरदृष्टी, त्यागी वृत्ती असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू Vuआहेत. “अशा या थोर,कर्तबगार ,पराक्रमी ,अहिल्यादेवीस आमचे विनम्र अभिवादन 🙏
( अहिल्याबाई होळकर यांचा चांदवड येथील वाडा )

anews Banner

Leave A Comment