*राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांची प्रकृती ठणठणीत ; पुढील उपचारासाठी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल*
*नांदेड, दि. २५ ; राजेश एन भांगे*
जिल्ह्याच्या विकासासाठी समाजात जावून अहोरात्र काम करीत असताना दुर्देवाने नांदेड चे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना कोरोनाची लागन झाल्याचा अहवाल रविवार दि. 24 रोजी प्राप्त झाला असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. केवळ खबरदारीचा उपाय म्हणून पुढील उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे दि. 24 रोजी सकाळी 10 वाजता त्यांचा कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आला. या स्वॅबचा अहवाल त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजता पॉझिटिव्ह प्राप्त झाला. तत्पूर्वी सकाळी 11 वाजताच काबरानगर परिसरातील आशा हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात पालकमंत्री अशोकराव चव्हाण कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची वार्ता राज्यभर पसरली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भ्रमणध्वनीवरून पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधून पुढील उपचारासाठी मुंबईस येण्याचा आग्रह धरला. त्यानुसार आज दि. 25 रोजी सकाळी 11 वाजता एका अंब्ल्युलन्सद्वारे औरंगाबाद-पुणे मार्गे ते मुंबईकडे रवाना झाले. यावेळी काँग्रेस विधान परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद आ. अमरनाथ राजुरकर, आ. मोहन हंबर्डे, भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके, माजी नगरसेवक सुभाष रायबोले, नगरसेवक संदीप सोनकांबळे यांची उपस्थिती होती. त्यांच्या समवेत निष्णात डॉक्टरांची टीम आहे. सुरुवातीला त्यांना मुंबई येथील ब्रिजकँडी हॉस्पिटलमध्ये दाखल काण्यात येणार असल्याची बरीच चर्चा झाली पण आता त्यांच्यावर मुंबईतीलच लिलावती हॉस्पिटल मध्ये पुढील उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री अशोक चव्हाण यांच्या निकटवर्तीयानी पीटीआयला दिली.
कोरोनाची त्यांच्यामध्ये कोणतीही तीव्र लक्षणे नाहीत. केवळ खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मुंबईला नेण्यात आले आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे कळताच काँग्रेस नेते खा. राहुल गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, माजी केंद्रीय मंत्री गुलाबनबी आझाद, अहेमद पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार, काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भ्रमणध्वनीवरून त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईक चौकशी केली.
Home Breaking News राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांची प्रकृती ठणठणीत ; पुढील उपचारासाठी...