Home नांदेड नागठाणा येथील शिवाचार्य महाराज व अन्य एकाच्या क्रूर हत्या प्रकरण घटनेतील आरोपीस...

नागठाणा येथील शिवाचार्य महाराज व अन्य एकाच्या क्रूर हत्या प्रकरण घटनेतील आरोपीस न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी

472
0

*नागठाणा येथील शिवाचार्य महाराज व अन्य एकाच्या क्रूर हत्या प्रकरण घटनेतील आरोपीस न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी*
*नांदेड, दि,२५ ; राजेश भांगे*
उमरी, नागठाणा येथील निर्वाणी मठाधीश बाल तपस्वी निर्वाण रुद्र शिवाचार्य पशुपतिनाथ महाराज व इतर एकाची हत्या प्रकरणी आरोपीस भोकर न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नागठाणा येथील निर्वाणी मठातील बाल तपस्वी निर्वाण रूद्र शिवाचार्य पशुपतिनाथ महाराज व भगवान रामराव शिंदे या दोघांची गावातील आरोपी साईनाथ आनंदा लिंगडे या आरोपीने दोघांची क्रूर हत्या केली होती अवघ्या दहा असाच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आज सोमवारी आरोपीस भोकर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक 29 मे पर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती धर्माबाद चे पोलीस उप अधीक्षक सुनील पाटील यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here